IPL 2026 Mini Auction Update News : IPL 2026 सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव (Mini Auction) आता अवघ्या काही तासांवर आला आहे. जगभरातील क्रिकेट फॅन्स या मोठ्या इव्हेंटची वाट पाहत आहेत. प्रत्येक टीमला त्यांच्या महत्त्वाच्या रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी मंगळवारी (16 डिसेंबर) अबू धाबीमध्ये मोठी बोली लागणार आहे. या लिलावात कोणता प्लेयर सर्वात जास्त महाग असेल, कोणत्या टीमकडे जास्त पैसे शिल्लक आहेत आणि नियम काय आहेत, या आणि अन्य तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.
ऑक्शन कधी आणि कुठे?
यंदाचा आयपीएल 2026 चा मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. हा एक दिवसाचा इव्हेंट असेल, जो अबु धाबी (Abu Dhabi) येथे आयोजित केला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (IST) या लिलावाला सुरुवात होईल.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction: ऑक्शन टेबलवर धमाका ! पाहा आयपीएल 2026 साठी 4 सर्वात महागडे खेळाडू कोण असणार? )
किती खेळाडूंची होणार खरेदी?
या ऑक्शनमध्ये एकूण 77 स्लॉट्स (जागा) भरायच्या आहेत. यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी (Overseas Players) 31 स्लॉट्स आहेत. सर्व टीम्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडे सर्वाधिक 13 स्लॉट्स रिकामे आहेत, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला (SRH) 10 स्लॉट्स भरायचे आहेत. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 25 खेळाडू त्यांच्या स्क्वॉडमध्ये ठेवू शकते, ज्यात जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू्ंची मर्यादा आहे. प्रत्येक टीमकडे किमान 18 खेळाडू असणे आवश्यक आहे.
लिलावासाठी किती खेळाडूंनी नोंदणी केली?
ऑक्शनसाठी सुरुवातीला 1355 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी फ्रँचायझींच्या विनंतीनुसार फक्त 359 खेळाडूंची अंतिम यादी (Shortlist) तयार करण्यात आली आहे. या यादीत 244 भारतीय आणि 115 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 40 खेळाडूंनी आपली बेस प्राईस सर्वाधिक म्हणजेच 2 कोटी रुपये ठेवली आहे. या 2 कोटी बेस प्राईसवाल्या खेळाडूंमध्ये व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) हे फक्त दोनच भारतीय खेळाडू आहेत.
सर्वात मोठी बोली कुणाला लागणार?
या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमेरुन ग्रीन (Cameron Green) हा सर्वात मोठा आकर्षण असेल. त्याची किंमत 25 कोटी रुपयांपेक्षाही पेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय, लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), जेमी स्मिथ (Jamie Smith) आणि रवी बिश्नोई हे खेळाडू देखील मोठी बोली मिळवतील, असा अंदाज आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : 170 च्या स्ट्राइक रेटचा बॅटर, जडेजाचा संभाव्य वारसदार! 5 Uncapped प्लेयर्सवर पैशांचा पाऊस ! )
टीमच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक?
खेळाडूंचे ट्रेडिंग (Trade) आणि रिटेन्शन (Retention) झाल्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडे सर्वाधिक पर्स शिल्लक आहे. त्यांच्याकडे 64.30 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडे 43.40 कोटी रुपये शिल्लक आहेत, म्हणजेच या दोन्ही टीम्स सर्वात जास्त खेळाडूंना विकत घेताना दिसतील.
आश्चर्याचा धक्का देणारे अनकॅप्ड प्लेयर्स कोण?
यंदा काही अनकॅप्ड (Uncapped) भारतीय खेळाडू सर्वांना आश्चर्यचकित करण्याची शक्यता आहे. फ्रँचायझी स्काऊट्स (Franchise Scouts) आणि कोच जम्मू-काश्मीरचा ऑलराऊंडर ऑकिब नबी (Auqib Nabi) आणि राजस्थानचा फास्ट बॉलर अशोक शर्मा यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशचा ऑलराऊंडर प्रशांत वीर आणि राजस्थानचा विकेटकीपर-बॅटर कार्तिक शर्मा यांच्यावरही मोठी बोली लागू शकते.
ॲक्सलरेटेड राऊंड (Accelerated Round) कधी सुरू होईल?
पहिल्या 70 खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाल्यानंतर ॲक्सलरेटेड राऊंड (Accelerated Round) सुरू होईल. यात राहिलेल्या सर्व खेळाडूंचा समावेश केला जाईल. त्यानंतर फ्रँचायझींना विकले न गेलेल्या खेळाडूंची नावे पुन्हा सबमिट करण्यास सांगितले जाईल, जे पुढील ॲक्सलरेटेड राऊंड्समध्ये येतील.
RTM कार्ड वापरता येणार?
हे मिनी-ऑक्शन असल्याने, टीम्सना त्यांच्या जुन्या खेळाडूंना परत विकत घेण्यासाठी RTM (Right to Match) कार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world