देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या इराणी कप (Irani Trophy 2024) स्पर्धेसाठी शेष भारताची टीम बीसीसीआयनं जाहीर केली आहे. रणजी स्पर्धा विजेती टीम आणि शेष भारत यांच्यातील सामना इराणी ट्रॉफीच्या अंतर्गत खेळला जातो. यंदा 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौमध्ये ही लढत खेळली जाणार आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या मॅचमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करणार आहे. अजिंक्यच्या कॅप्टनसीमध्येच मुंबईनं या सिझनमध्ये रणजी स्पर्धा जिंकली होती. मुंबईचं हे 42 वं विक्रमी विजेतेपद आहे. अजिंक्य रहाणेच्या टीमला आव्हान देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शेष भारत टीमचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) करणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईच्या तीन खेळाडूंवर नजर
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील 16 सदस्यीय मुंबई टीममध्ये पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे तिघंही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच काळापासून भारतीय टेस्ट टीमपासून दूर आहेत.
महाराष्ट्र आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड शेष भारताच्या टीमचं नेतृत्व करणार आहे. बंगालचा अनुभवी ओपनर अभिमन्यू इश्वरन व्हाईस कॅप्टन आहे. तसंच टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी झगडत असलेल्या इशान किशनचाही शेष भारताच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Ashwin: घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू )
इराणी ट्रॉफीसाठी मुंबईची टीम : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, तनुश कोटियन, हिमांशू सिंह, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान.
इराणी ट्रॉफीसाठी शेष भारताची टीम : ऋतुराज गायकवाड़ (कॅप्टन), अभिमन्यू इश्वरन (व्हाईस कॅप्टन), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), मानव सुतार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भूई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world