IPL 2026: SRH ला मिळणार नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कप गाजवणारा 'धुरंधर' करणार हैदराबादचं नेतृत्व?

IPL 2026, SRH New Captain: पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व ईशान किशन करण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्सच्या फिटनेसबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने, ईशान किशन आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हैदराबादचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

पॅट कमिन्स दुखापतग्रस्त 

पॅट कमिन्सला ॲशेस मालिकेदरम्यान गंभीर दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. हैदराबाद व्यवस्थापनाने या विषयावर सखोल चर्चा केली असून, ईशान किशन हा संघ नेतृत्वासाठी योग्य  मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) ईशानने झारखंडचे नेतृत्व करताना त्यांना पहिले जेतेपद मिळवून दिले होते.

Advertisement

(नक्की वाचा-  'Dhurandhar' Trailer: धुरंधर सिनेमातील 'या' कलाकाराची वाढली डोकेदुखी; रोज मिळत आहेत धमक्या)

टी20 विश्वचषकातील 'धमाका'

ईशान किशनने 2026 च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. नामिबिया आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावले.

ईशानचं जबरदस्त 'कमबॅक'

2024 मध्ये बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळल्यानंतर ईशानने घरगुती क्रिकेटमध्ये (SMAT) प्रचंड मेहनत घेतली. त्याने 10 डावात 517 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. "माझी कामगिरी पाहून देशातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. कठोर परिश्रम केले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून यशस्वी होऊ शकता," असे ईशानने माध्यमांशी बोलताना सांगितले.

(नक्की वाचा-  Cricket News: काव्या मारननं हे काय केलं? 'या' पाकिस्तानी खेळाडूंना टीममध्ये घेतलं, उडवले कोट्यवधी रुपये)

ईशान किशनने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि झारखंडसाठी केलेल्या यशस्वी नेतृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता आयपीएलच्या मोठ्या मंचावर नेतृत्वाची संधी मिळाली तर तो ऑरेंज आर्मीला यश मिळवून देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Topics mentioned in this article