Mumbai vs Jammu Kashmir Ranji Trophy : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट टीमचा (Mumbai Cricket Team) जम्मू काश्मीरनं पराभव केला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे रोहित शर्मा तब्बल दहा वर्षांनी रणजी ट्रॉफी मॅच खेळला. त्याच्या समावेशाचा फायदा मुंबईला झाला नाही. जम्मू काश्मीरनं मुंबईचा 5 विकेट्सनं पराभव केला. चार दिवसाचा हा सामना त्यांनी तिसऱ्याच दिवशी जिंकला हे विशेष
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं जिंकलं जम्मू काश्मीर?
जम्मू काश्मीरनं पहिल्या इनिंगमध्ये 86 रनची आघाडी घेतली होती. त्यानंतर मुंबईनं दुसऱ्या इनिंगमध्ये शार्दुल ठाकूरच्या झुंजार सेंच्युरीमुळे 290 पर्यंत मजल मारली. शार्दुलनं सर्वाधिक 119 रन केले. तर तनुष कोटियननं 62 रन काढत त्याला उत्तम साथ दिली.
शार्दुल आणि तनुषचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे या दिग्गज बॅटर्सचा समावेश होता. यापैकी एकालाही मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. त्यामुळे मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये 300 रनचा टप्पा ओलांडण्यात अपयश आलं.
( नक्की वाचा : रोहित शर्माला काय झालंय? जम्मू काश्मीरनं काढली उरली-सुरली लाज )
जम्मू काश्मीरला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट होतं. त्यांनी ते टार्गेट 5 विकेट्सच्या मोबदल्यातच पूर्ण केलं. मुंबईकडून शम्स मुलानीनं 4 विकेट्स घेतल्या. पण, त्याला अन्य बॉलर्सची साथ मिळाली नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला.
अबिद मुश्ताकनं शानदार सिक्स लगावत जम्मू काश्मीरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.