Rohit Sharma Fails in Ranji Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं फ्लॉप होत असलेल्या रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्येही अपयशी ठरलाय. फॉर्मच्या शोधात असलेला रोहित आज (गुरुवार, 23 जानेवारी) तब्बल 10 वर्षांनी रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला. पण, जम्मू काश्मीरविरुद्ध तो फक्त 3 रन काढून आऊट झाला.रोहितचा टीम इंडियातील सहकारी यशस्वी जैस्वालही अपयशी ठरला. दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली मुंबईची टीम पहिल्या इनिंगमध्ये फक्त 120 रन्सवरच संपुष्टात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईचा फ्लॉप शो
जवळपास 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्माकडून क्रिकेट फॅन्सना मोठी अपेक्षा होती. पण, रोहितला ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. मुंबईच्या इनिंगची सुरुवात करणाऱ्या रोहितनं एकूण 19 बॉलचा सामना केला. त्यामध्ये त्यानं फक्त 3 रन काढले. त्याला उमर नझिरनं आऊट केलं. पीके डोगरानं रोहितचा कॅच घेतला.
Rohit Sharma out for 3 in 19 😶
— Veena Jain (@DrJain21) January 23, 2025
Embarrass!ng #RohitSharma
pic.twitter.com/UIoY5tCj6Z
रोहितचा टीम इंडियातील सहकारी यशस्वी जैस्वालही फार कमाल करु शकला नाही. तो 4 रन काढून आऊट झाला. रणजी विजेत्या मुंबईच्या टीममध्ये अनेक दिग्गजांचाच समावेश आहे. पण, हे सर्व जण पहिल्या इनिंगमध्ये सपशेल अपयशी ठरले.
मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे (12), श्रेयस अय्यर (11) आणि शिवम दुबे (0) रन काढून आऊट झाले. शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक 52 रनची खेळी करत मुंबईला 100 रनचा टप्पा ओलांडून दिला. मुंबईची पहिली इनिंग 120 रन्सवरच आऊट झाली.
( नक्की वाचा : IND vs ENG : शर्माजी का बेटा छा गया, 13 बॉलमध्ये काढले 68 रन्स! टीम इंडियाचा इंग्लंडवर सहज विजय )
उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता शेवटचा सामना
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन असलेल्या रोहित शर्मानं शेवटचा रणजी सामना 2015 साली खेळला होता. उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात रोहितनं सेंच्युरी झळकावली होती. आज 10 वर्षांनी क्रिकेट फॅन्सना रोहितकडून त्याच पद्धतीच्या दमदार खेळीची अपेक्षा होती, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
रोहित शर्मासाठी 2024-25 चा सिझन निराशाजनक ठरतोय. या सिझनमध्ये त्यानं 16 इनिंगमध्ये फक्त 10.43 च्या सरासरीनं रन केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world