Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?

Jasprit Bumrah : बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, भारताचा आघाडीचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कप स्पर्धा खेळणार नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध पाचपैकी तीन टेस्टच खेळला.
मुंबई:

Jasprit Bumrah : बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, भारताचा आघाडीचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कप स्पर्धा खेळणार नाही.  त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून, सध्या सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील 5 पैकी फक्त 3 टेस्ट बुमराह खेळला होता. सूत्रांनी बुमराहच्या आशिया कपमधून बाहेर पडण्याचे हेच कारण सांगितले आहे. आशिया कपमध्ये भारत 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत खेळणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला तसंच 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कट्टर प्रतिस्पर्धकांमधील हा पहिला सामना असेल.

कशी होती बुमराहची कामगिरी?

 जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील 3 टेस्टचा कोटा पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रीय संघातून परत पाठवण्यात आले. भारतीय क्रिकेटमधील संबंधितांनी त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय असाइनमेंटवर चर्चा सुरू केली आहे. 31 वर्षांच्या बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधील 3 टेस्टमध्ये 119.4 ओव्हर्स बॉलिंग केली आणि 14 विकेट्स घेतल्या. बुमराहनं या सीरिजमध्ये दोन वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
 

आशिया कप 29 सप्टेंबर रोजी संपणार आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली टेस्ट 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये सुरू होईल, त्यानंतर 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दुसरी टेस्ट नवी दिल्लीत होईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 टेस्ट मॅच होणार आहेत. 

BCCI  नं काय सांगितलं?

"हा एक अवघड निर्णय असेल, पण बुमराहला टेस्ट क्रिकेट आवडते आणि यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्सही पणाला लागले आहेत. T20 बद्दल बोलायचं झाल्यास, तो जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धची सीरिज खेळू शकतो. ती सीरिज T20 वर्ल्ड कपची ड्रेस रिहर्सल असेल," असे बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेची माहिती असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

" बुमराह आशिया कप खेळला आणि समजा भारताने फायनल जिंकली, तर तो कोणत्याही परिस्थितीत अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळू शकणार नाही. साहजिकच प्रश्न येतो की, वेस्ट इंडिजविरुद्ध बुमराहची गरज आहे की त्याने एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आशिया कप खेळावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 कसोटी खेळाव्यात. तो निर्णय अजित अगरकर आणि गौतम गंभीर यांना घ्यावा लागेल," असेही सूत्रांनी सांगितले.
 

Topics mentioned in this article