
Neeraj Chopra trolled in Arshad Nadeem invitation : ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यावर एकेकाळी कौतुक सुमनं उधळली जात होती. ऑलिम्पिंकदरम्यान सोशल मीडियापासून सर्व टीव्ही वाहिन्यांवर त्यांच्या कौतुकाचा पाढा वाचला जात होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नीरज चोप्रा याला त्याच भारतीयांकडून टोकाची टीका सहन करावी लागत आहे. यावर नीरज चोप्रा सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. त्याच्याविरोधात सुरू असलेल्या टीकेवरही त्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. नीरजने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट करीत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
नीरज चोप्राने 24 मे रोजी बंगळुरूत आयोजित केलेल्या एनसी क्लासिक कार्यक्रमात पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमला निमंत्रण दिलं होतं. ज्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे. 23 एप्रिल रोजी काश्मीर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नीरज चोप्राला ट्रोल केलं जात आहे. नीरजने यावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य
नीरज चोप्राची सविस्तर पोस्ट...
सर्वसाधारणपणे मी कमी बोलणारी व्यक्ती आहे. मात्र काही चुकीचं घडत असेल तरीही मी शांत राहील असं नाही. विशेषत: माझं देशाबद्दलचं प्रेम, माझ्या कुटुंबाचा सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल तर मी शांत बसणार नाही. नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत अर्शक नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. यामध्ये अधिकतर राग आणि शिव्या येत आहेत. नीरजने पुढे लिहिलंय, लोकांनी माझ्या कुटुंबीयांनाही यात खेचलंय. अर्शदला बोलावणं म्हणजे एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूला निमंत्रण होतं. इतकंच. एनसी क्लासिकचा उद्देश भारतात सर्वश्रेष्ठ खेळाडूंना एकत्र आणणं आणि आपल्या देशाला जागतिक पातळीवरील खेळाच्या आयोजनाचं केंद्र बनवणं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी सोमवारी सर्व खेळाडूंना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 25, 2025
गेल्या 48 तासात जे काही घडलं त्यानंतर एनसी क्लासिकमध्ये अर्शद उपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझा देश आणि त्याचं हित नेहमीच अग्रस्थानी असेल. ज्यांचे नातेवाईक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेत त्यांच्यासोबत माझी संवेदना आहे. जे काही घडलं त्यामुळे देशवासियांसह मलाही चीड आहे. मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्याला न्याय मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world