Jay Shah : जय शाह होणार ICC चे बॉस, करणार नवा रेकॉर्ड

Jay Shah ICC New Chairman: क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या संचालकपदी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांची नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Jay Shah
मुंबई:

Jay Shah ICC New Chairman:  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान संचालक ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. आयसीसीचं सलग तिसऱ्यांदा संचालक होण्यास बार्कले यांनी मंगळवारी नकार दिला. त्यानंतर क्रिकेटचं नियंत्रण करणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या संचालकपदी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांची नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे. 

NDTV ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जय शाह आयसीसीचे नवे संचालक होऊ शकतात. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बोर्डानंही पाठिंबा दिला आहे. आयसीसी संचालक पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नवा रेकॉर्ड

जय शाह यांनी बीसीसीआय सचिव पदाचा कार्यकाळ एक वर्ष शिल्लक असतानाच  आयसीसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडं बीसीसीआयमधील चार वर्ष राहतील. ते 35 व्या वर्षी आयसीसी इतिहासातील सर्वात कमी वयाचे संचालक होऊ शकतात. 

यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या चार भारतीयांनी आयसीसीचं नेतृत्त्व केलं आहे. आयसीसी संचालक म्हणून दोन-दोन वर्षांच्या तीन कार्यकाळात काम करता येतं. न्यूझीलंडच्या बार्कले यांच्या कारकिर्दीची चार वर्ष पूर्ण झाली आहेत.  

Advertisement

( नक्की वाचा : एका ओव्हरमध्ये 39 रन! युवराज सिंहचा रेकॉर्ड तुटला, अनोळखी खेळाडूची सनसनाटी कामगिरी )

बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची 2022 साली या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. आयसीसी नियमांनुसार संचालकपदाच्या निवडणुकीत एकूण 16 मतं असतात. त्यामधील विजेत्या उमेदवाराला साधारण बहुमत (51%) मतं मिळणं आवश्यक आहे. यापूर्वी संचालक होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. 

जय शाह यांचा आयसीसीमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश होतो. ते सध्या आयसीसीच्या सर्वात प्रभावशाळी अर्थ आणि वाणिज्य विषयाच्या उपसमितीचे प्रमुख आहेत. संचालक पदासाठी एक पेक्षा अधिक जणांनी अर्ज भरला तर या पदासाठी निवडणूक घेतली जाईल. नव्या संचालकांचा कालावधी 1 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article