Paris Olympics 2024 : क्रीडा विश्वातील महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला पॅरिसमध्ये सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (26 जुलै) या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाकडं संपूर्ण जगाचं लक्ष असतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यजमान देश त्यांच्या संस्कृतीचं, शक्तीचं आणि व्हिजनचं दर्शन जगाला घडवतो. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमावर अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी जोरदार टीका केली आहे.
कंगनाहा या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला अत्यंत कामुक आणि इश्वराची निंदा करणारे कृत्य असं म्हंटलं आहे. कंगनानं संपूर्ण ऑलिम्पिकचं स्पर्धेला डाव्या लोकांनी हायजॅक केल्याची टीका केली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कंगना नाराज का?
कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमातील फोटो पोस्ट केली आहेत. त्यावर तिनं पॅरिस ऑलिम्पकवर - 'द लास्ट सपर'च्या अत्यंत कामुक आणि अपमानजनक रुपांतरणामध्ये एका मुलाचा समावेश केल्याबद्दल टीका होत असल्याचं म्हंटलं आहे.
ख्रिश्नन धर्माची थट्टा?
कंगनानं म्हंटलं आहे की, 'या कार्यक्रमात एका मुलाला ड्रॅग क्वीनसह दाखवण्यात आलं होतं. त्याच्या नग्न शरीरावर निळ्या रंगात येशूंना दाखवण्यात आलं आणि ख्रिश्चन धर्माची थट्टा करण्यात आली. डाव्या मंडळींनी ऑलिम्पिक 2024 ला पूर्णपणे हायजॅक केलं आहे. ही लाजीरवाणी बाब आहे.'
कंगानानं आणखी एका पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, 'फ्रान्सनं या पद्धतीनं ऑलिम्पिक 2024 मध्ये जगाचं स्वागत केलं. यामधून त्यांना काय संदेश द्यायचा आहे? सैतानाच्या जगात तुमचं स्वागत आहे? त्यांचा हाच हेतू आहे का?'
ऑलिम्पिकमध्ये समलैंगिकतेला प्रोत्साहन
अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगनानं ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमातील फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. तो शेअर करताना ती म्हणते, 'ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रम समलैंगिकतेला प्रोत्साहन करण्यासाठी होता. मी समलैंगिकतेच्या विरोधात नाही. पण, मला हे समजलं नाही की, ऑलिम्पिक स्पर्धेचा या प्रकारच्या लैंगिकतेचा काय संबंध? मानवतेचा सर्वोत्तम उत्सव मानल्या जाणाऱ्या या जागतिक कार्यक्रमावर सेक्सची सावली का? सेक्सला खासगी मर्यादेपर्यंत का ठेवण्यात येत नाही? त्याला राष्ट्रीय ओळख देण्याची काय गरज आहे? हे विचित्र आहे.
कंगनाच्या या पोस्टवरील अनेक प्रतिक्रियांमध्ये हा कार्यक्रम ख्रिश्चनांसाठी अपमानास्पद होता, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. एलन मस्कनंही या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा कार्यक्रम 'ख्रिश्चनांसाठी अत्यंत अपमानास्पद असल्याचं म्हंटलं आहे.अर्थात ऑलिम्पिक समितीच्या कोणत्याही आयोजकाने अथवा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारानं यामध्ये 'द लास्ट सपर'चं रुपांतर केलं होतं, असं म्हंटलेलं नाही.'
(नक्की वाचा : Paris Olympics 2024 : नेमबाजीत भारताची दमदार सुरुवात, 20 वर्षांनी केली विक्रमाची बरोबरी )
काय आहे 'द लास्ट सपर?'
'द लास्ट सपर' 15 व्या शतकातील इटलीचे प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी बनवलेलं एक पेंटिंग आहे. हे पेटिंग मिलान शहरातील सांता मारिया डेल गार्जी चर्चेच्या भिंतीवर काढण्यात आलं आहे. याबाबत सांगितलं जातं की, 'या पेटिंगमध्ये ख्रिश्चन मसीहाच्या अंतिम पवित्र भोजचं चित्रण करण्यात आलं आहे. यामध्ये ख्रिश्चन समाज येशूसोबत एकजूट असल्याचं प्रतीकात्मक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. या भोजनानंतर येशू ख्रिस्तांसोबत विश्वासघात होतो. त्यांनंतर त्यांना अटक होऊन सुळीवर चढवण्यात येतं. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींमध्ये याचा समावेश आहे.