जाहिरात

Lionel Messi : फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत! लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Lionel Messi Retirement News: जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे दैवत आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे.

Lionel Messi : फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत! लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
Lionel Messi : मेस्सीनं एक भावुक पोस्ट लिहित निवृत्तीची घोषणा केली.
मुंबई:

Lionel Messi Retirement News: जागतिक फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अखेर शेवट झाला आहे. जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे दैवत आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. 2026 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये स्पेनकडून मिळालेल्या पराभवानंतर काही महिन्यांनी मेस्सीने हा अत्यंत भावूक निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक हस्तलिखित पत्र पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.

काय म्हणाला मेस्सी?

39 वर्षांच्या मेस्सीने तब्बल 20 वर्षे अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, फायनलचा सामना झाल्यानंतर अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर मी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचे सांगत आहे. हा निर्णय माझ्या मनाला आतून खूप दुखावणारा आहे, पण हीच योग्य वेळ आहे हे मला समजले आहे. 

मी नेहमी या जर्सीसाठी सर्वस्व पणाला लावले, जेणेकरून अर्जेंटिनाच्या नागरिकांना आनंद आणि अभिमान वाटेल. आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरलेले नाही आणि नवीन तरुण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे.

चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी खास संदेश

आपल्या निवृत्तीच्या संदेशात मेस्सीने अर्जेंटिनाच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. गेली 20 वर्षे मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, आता मी मैदानात नसेन तर मैदानाबाहेरून नेहमी अर्जेंटिनाला सपोर्ट करत राहीन. चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुमच्यासोबत असेन. माझ्या या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबाचे, प्रशिक्षकांचे आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. देवानं  मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवला याबद्दल मी देवाचा आभारी आहे, असे मेस्सीने म्हटले.

वडिलांच्या निधनामुळे घोषणा करण्यास उशीर

मेस्सीने स्पष्ट केले की, त्याने हे निवृत्तीचे पत्र 21 जुलै रोजी म्हणजेच विश्वचषक फायनलच्या 2 दिवसानंतरच लिहिले होते. मात्र, त्याचे वडील हॉर्हे मेस्सी यांच्या गंभीर आजारपणामुळे आणि 8 ऑगस्ट रोजी रोझारिओ येथे झालेल्या त्यांच्या निधनामुळे त्याने ही घोषणा थांबवून ठेवली होती. वडिलांच्या निधनानंतर या निर्णयावर आपण अधिक ठाम झाल्याचे त्याने सांगितले. मेस्सीने 2006 मध्ये अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते.

फिफा विश्वचषकातील ऐतिहासिक कामगिरी

मेस्सीने 2006 ते 2026 या कालावधीत सलग 6 फिफा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. त्याने एकूण 34 सामन्यांमध्ये 21 गोल केले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. फ्रान्सच्या एमबापेने 22 गोल करत अव्वल स्थान पटकावले आहे. 2026 च्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने 8 गोल केले आणि 4 असिस्ट केले. अल्जिरियाविरुद्ध त्याने कारकिर्दीतील पहिली फिफा हॅटट्रिकही नोंदवली होती. 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकवून देणारा मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जातो.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com