Virat Wicket VIDEO: अचूक टप्पा, सुसाट स्पीड अन् दांडी गूल; प्रिन्सचा मॅजिकल बॉल पाहून किंग कोहलीही थक्क!

LSG vs RCB IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्सच्या प्रिन्स यादवने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला केवळ 2 चेंडूत शून्यावर बाद केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

 LSG vs RCB IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील गुरुवारी झालेल्या सामन्यात एका बाजूला मिचेल मार्शची शतकी आतिशबाजी पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाज प्रिन्स यादवने चक्क विराट कोहलीला क्लीन बोल्ड करून सर्वांच्या भुवया उंचावल्या. प्रिंन्स यादवने किंग कोहलीच्या घेतलेल्या या विकेटची चर्चा संपूर्ण क्रीडा जगतात आहे. 

विराट कोहलीही झाला चकीत

210 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिला. मात्र, खरा थरार दुसऱ्या षटकात पाहायला मिळाला. तरुण गोलंदाज प्रिन्स यादवने 140.4 किमी प्रतितास वेगाने एक जबरदस्त इनस्विंगर चेंडू टाकला. विराट कोहली चेंडूचा अंदाज घेण्यापूर्वीच चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून वेगाने आत घुसला आणि थेट ऑफ-स्टंप उडवला.

Advertisement

(नक्की वाचा-  Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)

बंदुकीच्या गोळीसारखा आलेला तो चेंडू पाहून कोहली देखील चकित होऊन काही काळ खेळपट्टीकडेच पाहत राहिला. एका युवा गोलंदाजाच्या अशा धारदार चेंडूवर आपण बाद झालो, यावर खुद्द 'किंग' कोहलीचाही विश्वास बसत नव्हता. 2 चेंडूत 0 धावा करून विराट तंबूत परतला आणि आरसीबीची अवस्था 18 धावांवर 2 बाद अशी झाली.

प्रिन्स यादवचा स्वप्नवत विजय

विराट कोहलीला बाद केल्यानंतर प्रिन्स यादवने मैदानात जोरात जल्लोष केला. कोणत्याही गोलंदाजासाठी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या कोहलीचा त्रिफळा उडवणे हे एका स्वप्नासारखे असते. सोशल मीडियावर प्रिन्सच्या या गोलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्याचे कौतुक होत आहे.

(नक्की वाचा-  IPL 2026: हार्दिक पांड्या MI च्या ताफ्यातून गायब! RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईची धाकधूक वाढली

मिचेल मार्शचे वादळी शतक अन् पंतचा धमाका

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सने 19  षटकांत 209 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर मिचेल मार्शने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत 56 चेंडूत 111 धावांची शानदार खेळी केली. यात 9 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकांत कर्णधार ऋषभ पंतने अवघ्या 10 चेंडूत 32 धावा कुटल्या, ज्यामुळे लखनौने भक्कम धावसंख्या उभारली.
 

Topics mentioned in this article