MS Dhoni : धोनीच्या अडचणीत वाढ; हरमूमधील बंगला का आला चर्चेत?

MS Dhoni Bungalow : भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची उत्कृष्ट कामगिरी पाहता राज्याच्या तत्कालीन अर्जुन मुंडा सरकारने त्याला मोकळी जमीन देण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडियाचा माजी कर्णदार महेंद्रसिंह धोनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हरमू येथील निवासी भूखंडाचा व्यावसायिक वापर केल्याचं प्रकरण चर्चेत आलं आहे. निवासी जमिनीचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याचा आरोप धोनीवर आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महेंद्रसिंग धोनीला झारखंड   हाउसिंग कॉलनीत जमीन भेट दिली होती. तर महेंद्रसिंग धोनीने स्वतः देखील तिथे काही जमीन खरेदी केली होती. यानंतर त्याने त्या जागेवर तिथे आलिशान घर बांधले. धोनी 2009 नंतर बरीच वर्षे कुटुंबासोबत या बंगल्यात राहत होता. त्यानंतर धोनीने रांचीच्या सिमलियामध्ये आणखी एक मोठा बंगला बांधला. 

(नक्की वाचा-  Robin Uthappa : माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी)

यानंतर तो कुटुंबासह त्याच बंगल्यात राहण्यास गेला. मात्र हरमू येथील बंगला अनेक वर्षे रिकामा राहिला. आता गेल्या काही महिन्यांपासून या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. धोनीने ही इमारत व्यावसायिक वापरासाठी भाड्याने दिल्याचेही समोर आले आहे. तर नियमानुसार गृहनिर्माण मंडळाच्या कोणत्याही भूखंडाचा किंवा भूखंडाचा व्यावसायिक वापर करता येणार नाही.

त्यानुसार झारखंडचे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष संजय लाल पासवान यांनी याची चौकशी करणार असल्याचे सांगितलं आहे.  याची चौकशी केली जाईल, असे झारखंड गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष संजय लाल पासवान यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वीही अनेक वाटपदारांना निवासी ब्लॉकच्या व्यावसायिक वापरासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा -  Viral News : तो iPhone देवाचा, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे वादंग)

भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची उत्कृष्ट कामगिरी पाहता राज्याच्या तत्कालीन अर्जुन मुंडा सरकारने त्याला मोकळी जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने 23 फेब्रुवारी 2006 रोजी हरमू हाउसिंग कॉलनी, रांची येथे भूखंडाचे वाटप केले. या भूखंडाचे क्षेत्रफळ 5 हजार चौरस फूट आहे.

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)