टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रॉबिन उथप्पाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भविष्य निर्वाह निधी (PF) घोटाळ्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पावर भविष्य निर्वाह निधी घोटाळ्याचा आरोप आहे. प्रादेशिक पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी त्यांच्याविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. यासोबतच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
(नक्की वाचा- Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)
An arrest warrant has been issued against former Indian cricketer Robin Uthappa over provident fund (PF) fraud. He is accused of deducting ₹23 lakh from employees' salaries and withholding their PF contributions while running Century Lifestyle Brand Private Limited pic.twitter.com/62uZnRSeWL
— IANS (@ians_india) December 21, 2024
सेंच्युरीज् लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन रॉबिन उथप्पा पाहत होता. आता रॉबिनवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापून नंतर त्यांच्या खात्यात जमा न केल्याचा आरोप होत आहे. अहवालानुसार, हा संपूर्ण घोटाळा 23 लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा - Viral News : तो iPhone देवाचा, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे वादंग)
पुलकेशीनगर पोलिसांना पत्र लिहून आयुक्त गोपाल रेड्डी यांनी या वॉरंटची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, उथप्पाने आपले राहण्याचे ठिकाण बदलले आहे, त्यामुळे पोलिसांना हे वॉरंट पीएफ कार्यालयात परत करावे लागले. त्यानंतर पोलीस आणि पीएफ विभाग माजी क्रिकेटपटूच्या निवासस्थानाचा शोध घेत आहेत. हे प्रकरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी निगडीत असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सध्या पोलीस आणि पीएफ विभाग संयुक्तपणे याचा तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world