जाहिरात

घटस्फोटाच्या चर्चेत Yuzvendra Chahal च्या पोस्टमधून भविष्याचे संकेत! म्हणाला, खरं असेल किंवा..

टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

घटस्फोटाच्या चर्चेत Yuzvendra Chahal च्या पोस्टमधून भविष्याचे संकेत! म्हणाला, खरं असेल किंवा..
मुंबई:

टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हे घटस्फोट घेणार असल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे. ही चर्चा सुरु झाल्यापासून चहलनं तिसरी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

चहल त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रीय असतो. तो त्या माध्यमातून त्याच्या फॅन्सची संवाद साधत असतो. घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करणे थांबवलेले नाही. चहलनं यापूर्वीच्या दोन पोस्टमध्ये अप्रत्यक्ष संदेश दिला होता. आता त्यानं तिसरी पोस्ट टाकली असून त्यामधून आणखी एक महत्त्वाचा गुगली टाकला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला चहल?

चहलनं या पोस्टमध्ये त्याला आजवर नेहमी पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या फॅन्सचे आभार मानले आहेत. त्यांच्याशिवाय हा प्रवास करणे आपल्याला शक्य नसल्याची भावना चहलनं व्यक्त केलीय. पण,आणखी बऱ्याच ओव्हर्स बाकी आहेत. माझी टीम, माझा देश आणि फॅन्ससाठी या ओव्हर्स बाकी असल्याचं चहल म्हणाला.

मला खेळाडू म्हणून अभिमान आहे. त्याचबरोबर मी मुलगा, भाऊ आणि मित्र देखील आहे. गेल्या काही दिवसांमधील घडलेल्या घटनांबद्दल, विशेषत: माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकता आहे, हे मी समजू शकतो. विशेषत: काही सोशल मीडिया पोस्टमध्ये काही गोष्टींचा अंदाज बांधण्यात आला आहे. त्या गोष्टी खऱ्या असतील किंवा नाही,' अशी पोस्ट चहलनं केली आहे.

( नक्की वाचा : Yuzvendra Chahal च्या मनात काय सुरु आहे? घटस्फोटाच्या चर्चेत नव्या पोस्टचा अर्थ काय? )

या पोस्टमध्ये चहल पुढे म्हणतो की, एक भाऊ, मुलगा आणि मित्र म्हणून माझ्या आयुष्यातील घटनांचा स्वैर अर्थ लावू नका. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास होत आहे. मला तुमचे प्रेम आणि पाठिंब्याच्या ऋणात राहयला आवडेल, सहानभूतीच्या नाही. असा चहलच्या या पोस्टमधील उत्तरार्धाचा अर्थ आहे.

चहलनं या पोस्टमध्ये स्वत:चा उल्लेख खेळाडू, मुलगा, भाऊ आणि मित्र असा केला आहे. पण नवरा असा कोणताही उल्लेख त्यानं केलेला नाही. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करताना त्यानं पत्नी धनश्री वर्माचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता चर्चा झाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

काय म्हणाली होती धनश्री?

धनश्री वर्मानं यापूर्वी बुधवारी (8 जानेवारी) रोजी पोस्ट करत या विषयावर मौन सोडलं होतं. ले काही दिवस माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते. बिनबुडाचे निराधार, लिखाण हे वेदनादायी आहे. विद्वेष पसरवणाऱ्या ट्रोलर्समुळे माझे चारीत्र्यहनन होत आहे."

"मी नाव कमावण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला आहे. माझे मौन म्हणजे हतबलता नसून ते खंबीरतेचे प्रतीक आहे, अशी पोस्ट धनश्रीनं केली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com