Yuzvendra Chahal Instagram Story: टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल हा त्याच्या लेगस्पिनसाठी ओळखला जातो. चहल लयमध्ये असला की जगातील कोणताही दिग्गज त्याच्यापुढे टिकत नाही. सर्वात प्रतिष्ठेच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड चहलच्या नावावर आहे. क्रिकेटच्या मैदानात अचूक बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेला चहलच्या आयुष्यातील लय सध्या बिघडली असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या खासगी आयुष्यावर चर्चा सुरु आहे. ही दोघं घटस्फोट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनश्रीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत चहलनं एक नवी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यानं महान तत्वज्ञ सॉक्रेटिसचं वाक्य टाकलं आहे. त्यामुळे चहलच्या मनात नेमकं काय आहे? यावर चर्चा सुरु झाली आहे. तीन दिवसांपूर्वी चहल-धनश्री घटस्फोट घेणार असल्याची बातमी पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर चहलची ही दुसरी पोस्ट आहे.
काय म्हणाला चहल?
'गोंगाटाच्या पलीकडे ऐकू शकतात त्या सर्वांसाठी शांतता हा सर्वात खोल आवाज आहे - सॉक्रेटीस' या एका वाक्यात चहलनं त्याच्या मनातील गोष्ट सोशल मीडियावर मांडली आहे.
यापूर्वी काय म्हणाला होता चहल?
युजवेंद्र चहल हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो त्याच्या फॅन्सशी नियमित संवाद साधतो. धनश्रीसोबत घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यावर त्यानं यापूर्वी शनिवारी एक पोस्ट केली होती. 'कठोर मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकण्याचे काम करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहिती असतो. तुमच्या वेदना तुम्हाला माहिती असतात. इथंवर पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे. जगाला माहिती आहे. तुम्ही खंबीरपणे उभे राहा.' अशी पोस्ट चहलनं केली होती.
( नक्की वाचा : Fact Check : शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय? )
युजवेंद्र चहल आणि धनश्रीनं 11 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं आहे. धनश्री कोरिओग्राफर आहे. लॉकडाऊनमध्ये त्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. चहलनं धनश्रीकडं डान्स शिकण्यासाठी शिकवणी लावली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world