धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video

MI vs CSK IPL 2024 : क्रिकेट फॅन्सच्या मनात वानखेडे स्टेडियमवरील 13 वर्ष जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीनं फक्त 4 बॉलमध्ये मैदानातील वातावरण बदललं
मुंबई:

मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं  (MI vs CSK IPL 2024) 20 रननं दमदार विजय मिळवला. सीएसकेच्या विजयातच पथिराणाची बॉलिंग निर्णायक ठरली. त्यानं 28 रन देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर या मॅचमध्ये एक खास गोष्ट घडली. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच्या मनात वानखेडे स्टेडियमवरील 13 वर्ष जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 13 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीनं निर्णायक सिक्स लगावत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं.

मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आलेल्या धोनीनं फक्त 4 बॉलमध्ये सारा माहोल बदलला. क्रिकेट फॅन्सना कधीही न विसरणारी आठवण त्यानं दिली. 

शेवटच्या ओव्हरमधील थरार

डॅरेल मिचेल आऊट झाल्यानंतर धोनी मैदानात उतरला. सीएसकेच्या इनिंगमधील ती शेवटची ओव्हर होती. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या बॉलिंग करत होता. संपूर्ण मैदानात धोनी-धोनी असा गजर सुरु होता. प्रत्येकाला धोनीकडून सिक्स आणि फोरची अपेक्षा होती. 

शेवटचे चार बॉल आणि धोनी

धोनीचा पहिला बॉल - Long-off वरुन धोनीनं सिक्सर लगावला. फॅन्सनं आनंदानं मैदान डोक्यावर घेतलं.

दुसरा बॉल - Long - on वरुन सिक्स.. क्रिकेट फॅन्सचा आनंद गगनात मावत नव्हता. मैदानात काहीही ऐकू येत नव्हतं. रवी शास्त्री त्यावेळी कॉमेंट्री करत होते. ते म्हणाले, 'हे आपण पहिल्यांदाही पाहिलंय.' क्रिकेट फॅन्सचा उत्साह शिगेला पोहोचला होता. 

तिसरा बॉल - सिक्स.. सलग तिसऱ्या बॉलला सिक्स. वानखेडे स्टेडियमवर फक्त धोनी-धोनी हा आवाज ऐकू येत होता. रवी शास्त्री म्हणाले, 'आणखी एक सिक्स. तीन बॉलमध्ये 3. easy game of cricket'

Advertisement

आता ओव्हरमधील एक बॉल बाकी होता. धोनीनं आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये 18 रन काढले होते. हार्दिक पांड्याला काही समजत नव्हतं. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये शांतता होती. पण क्रिकेट फॅन्स आनंदानं नाचत होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ही त्यांच्यातील खुन्नस याक्षणी संपली होती. सर्वजण फक्त धोनीची बॅटिंग पाहात होते. महान भारतीय क्रिकेटपटूच्या खेळाचा आनंद घेत होते. 

Advertisement

टी-20 वर्ल्डकपआधी 'ही' गोष्ट कराच, CSK च्या कोचचा टीम इंडियाला सल्ला
 

शेवटचा बॉल (धोनीचा चौथा बॉल) : या बॉलवर धोनीनं 2 रन काढले. सीएसकेनं 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 206 रन काढाले. धोनीला शेवटच्या बॉलवर सिक्स मारता आला नाही. पण, त्यानं 2 रन काढत स्वत:चा स्कोअर 20 रनवर पोहोचवला. धोनीनं फक्त 4 बॉलमध्ये 500 च्या स्ट्राईकरेटनं नाबाद 20 रन केले. क्रिकेट फॅन्सच्या ऱ्हदयात आणखी एक अजरामर खेळी बंदिस्त झाली. 
 

Topics mentioned in this article