Mumbai Indians Success Story : मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा (MI vs RR) 100 रन्सनं पराभव करत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतलीय. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टीमचा या सिझनमधील प्रवास 'बॉटम टू टॉप' असा झाला आहे. मुंबईची सुरवात अडखळती होती. पहिल्या पाच पैकी फक्त एका मॅचमध्ये टीमला विजय मिळला होता. पण, त्यांनतर टीमनं जोरदार कमबॅक केलं. पुढील सहा मॅच सलग जिंकल्या आहेत. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सकडं यंदाही विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून बघितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई इंडियन्सच्या विजयाची सहा प्रमुख कारणं काय आहेत ते पाहूया
रोहित शर्माचा इम्पॅक्ट
टीम इंडियाचा टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य वेळी गवसलेला फॉर्म हा मुंबई इंडियन्सच्या विजयी अभियानाचं मुख्य कारण आहे. रोहितसाठी या सिझनची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यानं पहिल्या 5 सामन्यात फक्त 56 रन्स काढले होते. त्यानंतर रोहितला सूर गवसला. त्यानंतरच्या 5 मॅचमध्ये रोहितनं 3 हाफ सेंच्युरीसह 234 रन्स काढले आहेत. रोहित फॉर्ममध्ये आल्यानं टीमला भक्कम सुरुवात मिळतीय. त्याचा फायदा मिडल ऑर्डरच्या बॅटरना होतोय.
( Rohit Sharma : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )
डिपेंडेबल मिडल ऑर्डर
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ही टीम इंडियाच्या T20 टीममधील मीडल ऑर्डर मुंबई इंडियन्सकडं आहे. हे त्रिकूटही सातत्यानं रन्स करतंय. सूर्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आहेत. तिलक वर्माला एकदा संथ खेळामुळे रिटायर आऊट करावं लागलं होतं. पण, त्यानंतर त्यानं चांगलं कमबॅक केलंय. तर हार्दिक पांड्या फिनिशरचं काम चोख बजावतोय. मिडल ऑर्डरमधील त्रिकुटाच्या सातत्यपूर्ण खेळामुळेच मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत 4 वेळा 200 पेक्षा जास्त रन्स केले आहेत.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )
हार्दिकची कॅप्टनशिप
मुंबई इंडियन्सनं गेल्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं. त्या निर्णयावर जोरदार टीका झाली. मागील सिझनमध्ये टीमच्या निराशाजनक कामगिरीचं ते प्रमुख कारण मानलं जात होतं. या सिझनमध्ये हार्दिक कॅप्टन म्हणून सरस कामगिरी करतोय. त्यानं या सिझनमध्ये 172.52 च्या स्ट्राईक रेटनं रन्स केले आहेत. तसंच 13 विकेट्स घेतल्या आहेत. बॅटिंग आणि बॉलिंग प्रमाणेच कॅप्टन म्हणूनही तो उत्तम कामगिरी करतोय. एक कॅप्टन म्हणून खेळाडूंचा आदर मिळवणे आणि त्यांना चांगलं खेळण्यास प्रवृत्त करण्याचं काम हार्दिकनं यंदा केलंय. मुंबई इंडियन्सच्या यशात त्याचा मोठा वाटा आहे.
फास्ट बॉलिंगचं त्रिकूट
टीम इंडियाचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सुरुवातीच्या टप्प्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याचा थेट परिणाम टीमच्या कामगिरीवर झाला. बुमराहनं परत येताच त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं बॉलिंग केली. त्याच्या जोडीनं अनुभवी ट्रेंट बोल्टचा खेळही उंचावला आहे. तसंच सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट घेण्याचं काम दीपक चहर सातत्यानं करतोय. मुंबई इंडियन्सच्या यापूर्वीच्या विजेतेपदात तीन प्रमुख फास्ट बॉलर्सची दमदार कामगिरी हा महत्त्वाचा फॅक्टर होता. मागील काही सिझनमध्ये बुमराह आणि जोफ्रा आर्चरच्या दुखापतीमुळे मुंबईला फास्ट बॉलर्सकडून अपेक्षित रिझल्ट मिळत नव्हते. या सिझनमध्ये ती चिंता दूर झालीय. त्याचा फायदा मुंबईला होतोय.
Photo Credit: PTI
स्पिनर्सचा सहभाग
मुंबई इंडियन्सकडं एकेकाळी हरभजन सिंग, प्रग्यान ओझा हे अनुभवी स्पिनर्स होते. टीमच्या यशात त्याचं योगदान मोलाचं होतं. पण, मागील काही सिझनमध्ये मुंबईनं स्पिनर्स हा विषयच ऑप्शनला टाकला होता. या सिझनमधील ऑक्शनमध्ये मुंबईनं ही चूक सुधारली.
न्यूझीलंडच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन मिचेल सँटरनरला खरेदी केलं. अनुभवी सँटनरच्या समावेशानं मुंबईची स्पिन बॉलिंग भक्कम बनली. त्याचबरोबर करन शर्मा हा आयपीएलमधील जुना स्पिनरही यंदा मुंबईकडं परतला. तो देखील गेली काही मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. विल जॅक्सनं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध निर्णायक क्षणी विकेट्स घेत सामना मुंबईकडं झुकवला होता.
थिंक टँकची कामगिरी
आयपीएल स्पर्धेत सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सकडं नेहमीच उत्तम सपोर्ट स्टाफ आहे. या सपोर्ट स्टाफचाही मुंबईच्या यशात मोलाचा वाटा असतो. त्यांनी घेतलेले निर्णय या सिझनमध्ये टीमच्या यशाला पुरक ठरतायत. सनरायझर्स हैदराबादच्या विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलर्सनी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या बॅटपासून बॉल दूर राहिल याची खबरदारी घेतली. त्यामुळे त्यांना वेगाने रन्स करता आले नाहीत.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सनं जसप्रीत बुमराहनं सुरुवात केली. तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दीपक चहरच्या स्विंग बॉलिंगर भर दिला. लखनौविरुद्ध मॅचअपचा वापर करत मिचेल सँटरनरचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला नाही. विल जॅक्सला लवकर बॉलिंग दिली. मागील काही सामन्यात सुरुवातीला बेंचवर बसलेल्या करन शर्माला खेळवलं. मुंबईच्या थिंक टँकचे हे निर्णय टीमच्या विजयी सिक्सर्समध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरले आहेत.