Rohit Sharma Flop Show in Ranji Trophy: टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये रोहित अपयशी ठरला होता. त्यानंतर तो मोठ्या खेळीच्या शोधात रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला. जम्मू काश्मीर विरुद्धच्या रणजी मॅचमध्येही रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे.
मुंबईत सुरु असलेल्या रणजी मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये रोहित फक्त 3 रन काढून आऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तरी तो हे अपयश धुऊन टाकेल असं मानलं जात होतं. रोहित या इनिंगमध्ये दोन अंकी धावसंख्या करत एक टप्पा पूर्ण केला. त्यानं 3 सिक्स लगावत आक्रमक सुरुवात केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित शर्मा लयात येत आहे, असं वाटत असतानाच युद्धवीर सिंगनं आऊट केलं. आऊट होण्यापूर्वी त्यानं 35 बॉलमध्ये 28 रन काढले होते. रोहितनं या खेळीत 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. रोहितचा टीम इंडियातील ओपनिंगचा सहकारी यशस्वी जैस्वालही दुसऱ्या इनिंगमध्ये स्वस्तात आऊट झाला. त्यालाही युद्धवीर सिंगनंच आऊट केलं. यशस्वीनं 26 रन काढले. यशस्वीला पहिल्या इनिंगमध्ये 4 रनच करता आले होते.
मुंबईची पुन्हा निराशा
रणजी ट्रॉफीतील स्पर्धेतील या मॅचमध्ये मुंबईची पहिली इनिंग 120 रनवरच संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना जम्मू काश्मीरनं पहिल्या इनिंगमध्ये 206 रन काढले. जम्मू काश्मीरला पहिल्या इनिंगमध्ये 86 रन्सची आघाडी मिळाली.
( नक्की वाचा : रोहित शर्माला काय झालंय? जम्मू काश्मीरनं काढली उरली-सुरली लाज )
मुंबईच्या दिग्गज बॅटर्सनी दुसऱ्या इनिंगमध्येही निराशा केली. अजिंक्य राहणे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे मुंबईचे दिग्गज झटपट आऊट झाले. त्यांनी अनुक्रमे 16, 17 आणि 0 रन केले.