Afghan fan misbehaves with Shaheen Afridi: पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना रविवारी डब्लिनमध्ये झाला. या सामन्याच्या दरम्यान पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीबरोबर अफगाणिस्तानच्या फॅननं गैरवर्तन केलं. जियो न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार शाहीन ड्रेसिंग रुममध्ये जात असताना हा प्रकार घडला. आफ्रिदीनं सुरुवातीला अफगाणिस्तामनच्या फॅन्सच्या आक्षेपार्ह भाषेकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतरही तो फॅन थांबत नव्हता. त्यानंतर आफ्रिदीनं सुरक्षा रक्षकांना याबाबत कळवलं. त्यांनी तातडीनं त्या फॅनला मैदानातून बाहेर काढलं.
डब्लिनमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्ताननं 7 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह पाकिस्ताननं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. मोहम्मद रिझवान आणि फखर झमान या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 140 रनची भागिदारी करत या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रिझवाननं नााबाद 75 तर फखरनं 78 रन केले. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम या मॅचमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याला खातंही उघडता आलं नाही.
( नक्की वाचा : Video : पाकिस्तानी क्रिकेटमध्ये भूकंप, 2 सिनिअर खेळाडूंमध्ये जोरदार भांडण? )
यापूर्वी आयर्लंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 193 रन केले होते. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 3 विकेट्स घेतल्या. तर अब्बास आफ्रिदीला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद आमीर आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आता तीन सामन्यांच्या मालिकेचा फैसला मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात होणार आहे. जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश आहे.