भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (India Australia Match) संघ तब्बल दोन महिन्यांनंतर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) अंतर्गत दोन्ही संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला पाकिस्तानी वंशाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाकडून (Usman Khawaja) मोठ्या अपेक्षा आहेत. ख्वाजा युनूसने भारतीय संघाविरोधात खेळताना बऱ्याचदा उत्तम खेळी साकारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ यापूर्वी भारतामध्ये आला असताना अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने खेळपट्टीवर अशरश: ठाण मांडलं होतं. त्याने फिरकीपटूंना पूर्णपणे निष्प्रभ केलं होतं. ख्वाजाचे आई वडील हे मूळचे पाकिस्तानचे असून ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते.
नक्की वाचा : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल
ख्वाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात आपले स्थान भक्कम केले आहे. या 37 वर्षांच्या डावखुऱ्या फलंदाजाने 2018 साली निकाह केला होता. उस्मानने त्याची गर्लफ्रेंड रेचल मॅक्लेनसोबत लग्न केले आहे. रेचलने लग्न करण्यापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. त्यानंतर उस्मान आणि रेचलचे इस्लामी पद्धतीनुसार विवाह झाला होता. रेचल उस्मान ख्वाजापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. मूळच्या कॅथोलिक ख्रिश्चन असलेल्या रेचलची आणि उस्मानची 2016 साली एंगेजमेंट झाली होती. यानंतर दोन वर्षांनी या दोघांचा निकाह झाला. हे दोघे आता दोन गोड मुलींचे पालक झाले आहेत. या दोघांच्या मोठ्या मुलीचे नाव आयशा तर लहान मुलीचे नाव आयला आहे.
बघता क्षणी प्रेमात पडले
उस्मान ख्वाजा 4 वर्षांचा असताना त्याचे आई-वडील पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे स्थायिक झाले होते. उस्मान आणि रेचलची पहिली भेट सिडनीमध्ये झाली होती. उस्मान आणि रेचल पाहता क्षणी एकमेकाच्या प्रेमात पडले होते. रेचलच्या 21 व्या वाढदिवशी उस्मानने तिला मागणी घातली होती. रेचलने त्याची मागणी स्वीकार केली. उस्मान ख्वाजा हा वैमानिकही आहे. त्याच्याकडे व्यावसायिक पायलटचा परवाना आहे. उस्मानने पायलट होण्यापेक्षा क्रिकेटवर अधिक लक्ष्य केंद्रित केले होते.
नक्की वाचा : Gary Kirsten पाकिस्तानच्या दोस्ती यारी ग्रुपचे नवे प्रमुख' माजी क्रिकेटपटूचा थेट आरोप
उस्मान ख्वाजाने 73 कसोटी सामन्यांमध्ये 5451 धावा केल्या आहेत ज्यात 15 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. ख्वाजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ही 195 धावांची आहे. ख्वाजाच्या नावावर 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1554 धावा आहेत ज्यात दोन शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. ख्वाजाने 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात त्याने 241 धावा केल्या आहेत. ख्वाजाच्या नावावर 203 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 14145 धावा आहेत.