जाहिरात

IND vs BAN : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल

India vs Bangladesh, Kanpur Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या सुपर फॅनला मारहाण झाल्याचा आरोप आहे.

IND vs BAN : भारत-बांगलादेश टेस्टच्या दरम्यान बांगलादेशी फॅनला बेदम मारहाण? हॉस्पिटलमध्ये दाखल
Bangladesh super fan Tiger Roby (Photo - © X (Twitter)
मुंबई:

India vs Bangladesh, Kanpur Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये दुसरी टेस्ट सुरु आहे. टीम इंडियानं या सीरिजमधील पहिली टेस्ट जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी जिंकली आहे. कानपूर टेस्टच्या इराद्यानं टीम इंडिया कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये उतरली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये बांगलादेशचा 'सुपर फॅन' कादीर उर्फ टायगर रुबीला बेदम मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणात 'दैनिक जागरण' नं दिलेल्या वृत्तानुसार मॅचच्या दरम्यान बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या कादिरचा झेंडा खाली पडल. त्यानंतर बाऊन्सरनं त्याला मागे जाण्यास सांगितलं. कादिरनं त्यांची सूचना ऐकली नाही आणि काही अपशब्द वापरले. त्यानंतर बाऊन्सरनी त्याला पकडलं आणि मागं नेलं. त्यानंतर त्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे. कादिर बेशुद्ध पडला असून पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. 

या प्रकरणात पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था हरिशचंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार कादिरला डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्याला स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आलेली नाही. 

कादिरनं या प्रकरणात मीडियाशी बोलताना त्याला पोटावर मारहाण करण्यात आल्याचा दावा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तो स्टँडबाहेर आला तेव्हा वेदनेनं विव्हळत होता. त्याला बसण्यासाठी खूर्ची दिली पण, तो त्यावरुन खाली पडला.' कादिरला प्राथमिक उपचार देण्यात आले, तसंच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली, अशी माहिती स्टेडियममध्ये उपस्थित पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. 

IPL 2025 पूर्वी CSK ला मोठा हादरा, 'कामाचा माणूस' KKR मध्ये दाखल

( नक्की वाचा :  IPL 2025 पूर्वी CSK ला मोठा हादरा, 'कामाचा माणूस' KKR मध्ये दाखल )

पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा

दरम्यान, कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 35 ओव्हर खेळ होऊ शकला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवला त्यावेळी बांगलादेशनं 3 आऊट 107 रन केले. भारताकडून आकाशदीपनं 2 तर आर. अश्विननं 1 विकेट घेतली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com