पाकिस्तानची क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मेलबर्नमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 2 विकेट्सनं निसटता पराभव केला. या अटीतटीच्या सामन्यातील कॉमेंट्री दरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन वसिम अक्रमनं त्याच्याच देशाच्या खेळाडूची थट्टा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी कॅप्टम मायकल वॉन हे देखील शांत बसले नाहीत. त्यांनी देखील थट्टा करताना सर्व मर्यादा ओलांडल्या.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
हे सर्व प्रकरण पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान गुलामशी संबंधित आहे. कामरानला 11 भाऊ आणि 4 बहिणी आहेत. या सामन्याच्या कॉमेंट्री दरम्यान अक्रमनं सांगितलं की, 'कामरान गुलाम एका मोठ्या कुटुंबातून येतो. तो 12 भाऊ आणि 4 बहिणींमध्ये त्याचा 11 वा क्रमांक आहे.
अक्रमनं हे सांगताच मायकल वॉननं आश्चर्य व्यक्त केलं. तो लगेच म्हणाला, '16 मुलं. वाह! त्यांच्या वयात किती अंतर असेल? हे खरोखरचं औत्सुक्याचं आहे.
अक्रम आणि वॉन यांचं बोलणं तरी समजू शकतो, पण त्यानंतर अॅडम गिलख्रिस्टनं सर्व मर्यादा ओलांडली. त्यानं कामरानच्या कुटुंबाची थट्टा करण्याची संधी सोडली नाही. त्याचं कुटुंब म्हणजे पाकिस्तानची निवड समिती बनली आहे.'
( नक्की वाचा : )
मोठी खेळी करण्यात अपयश
कामरान गुलामनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच सेंच्युरी झळकावली होती. पण, त्याचं वन-डे पदार्पण अपयशी ठरलं. पाचव्या क्रमांकावर बॅटींगला आलेला कामरान फक्त 6 बॉल मैदानात टिकला. त्यानं 83.33 च्या स्ट्राईक रेटनं फक्त 5 रन केले. त्याला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं आऊट केलं.