जाहिरात

Gary Kirsten यांनी पाकिस्तान टीमचं प्रशिक्षकपद का सोडलं? खरं कारण उघड

Why Gary Kirsten Quit? : अनिश्चिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी आणखी एक अनपेक्षित घटना घडली आहे

Gary Kirsten यांनी पाकिस्तान टीमचं प्रशिक्षकपद का सोडलं? खरं कारण उघड
File photo of Gary Kirsten
मुंबई:

Why Gary Kirsten Quit As Pakistan's White-Ball Coach? : अनिश्चिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी आणखी एक अनपेक्षित घटना घडली आहे. पाकिस्तानच्या व्हाईट बॉल क्रिकेट टीमचे (ODI & T20I) हेड कोच गॅरी कस्टर्न यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. टीम इंडियानं 2011 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचे कस्टर्न मुख्य प्रशिक्षक होते. त्यांची याच वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या व्हाईट बॉल क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. या नियुक्तीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये कस्टर्न यांनी राजीनामा दिलाय. कस्टर्न यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानच्या टेस्ट टीमचे हेड कोच जेसन गिलेस्पीकडं अन्य दोन्ही टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कस्टर्न यांनी राजीनामा का दिला?

कस्टर्न यांनी दिलेल्या राजीनाम्याचं मुळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) कारभारात दडलंय, अशी माहिती समोर आली आहे. PCB नं पाकिस्तान क्रिकेट टीमच्या निवडीचे संपूर्ण अधिकार हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीकडं सोपवले आहेत. टीम निवडीमध्ये कोच आणि कॅप्टनच्या कोणत्याही सूचना न स्विकारण्याचा निर्णय PCB नं घेतलाय. त्यानंतर कस्टर्न आणि PCB मध्ये मतभेेद निर्माण झाले, अशी माहिती याबाबतच्या वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.  

पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीनं रविवारी (27 ऑक्टोबर) आगामी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीमची घोषणा केली. या टीमच्या निवडीमध्येही कस्टर्न यांच्या सूचनांचा विचार करण्यात आलेला नव्हता. या टीमच्या कॅप्टनपदी मोहम्मद रिझवानची नियुक्ती करतानाही कस्टर्न यांच्याशी चर्चा करण्यात आली नव्हती. टीमच्या नव्या कॅप्टनची नियुक्ती जाहीर होत असताना ते पाकिस्तानमध्येही नव्हते. या सर्व प्रकारामुळे परिस्थिती आणखी चिघळली. त्यानंतर कस्टर्न यांनी राजीनामा दिला. 

( नक्की वाचा : 'Gary Kirsten पाकिस्तानच्या दोस्ती यारी ग्रुपचे नवे प्रमुख' माजी क्रिकेटपटूचा थेट आरोप )
 

गॅरी कस्टर्न यांची पाकिस्चानचे व्हाईट बॉल कोच म्हणून एप्रिल 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी दोन वर्ष होता. पण T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. अगदी नवख्या अमेरिकेनंही पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत PCB आणि निवड समितीमधूनच गंभीर प्रश्न विचारण्यात येत होते. त्यानंतर PCB नं कस्टर्न यांचे अधिकार कमी केले. त्यांनी टीम निवडीची संपूर्ण जबाबदारी निवड समितीकडं सोपवली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com