Pakistan Cricket पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला भर मैदानात बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Pakistan Cricket Player :  पाकिस्तान क्रिकेट टीमशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Haider Ali : ब्रिटीश पोलिसांनी हैदरचा पासपोर्ट जप्त केला आहे.
मुंबई:

Pakistan Cricket Player :  पाकिस्तान क्रिकेट टीमशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा तरुण बॅटर हैदर अली (Haidar Ali) याला इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी घडली असल्याचं सांगितलं जात आहे.

Telecomm Asia Sports च्या रिपोर्टनुसार, हैदर अली इंग्लंडमध्ये पाकिस्तान 'ए' टीम (पाकिस्तान शाहीन) कडून मेलबर्न क्रिकेट क्लब विरुद्ध कँटरबरी मैदानावर सामना खेळत असताना, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्याला थेट मैदानातून ताब्यात घेतलं.

काही वेळाने त्याला जामिनावर सोडण्यात आलं असलं, तरी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे, जेणेकरून तो इंग्लंड सोडून जाऊ शकणार नाही. ही घटना समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देखील कारवाई केली असून, त्याला सध्या निलंबित करण्यात आलं आहे.

( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोप करणारी महिला पाकिस्तानी वंशाचीच आहे. PCB च्या एका अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, बोर्ड या प्रकरणाची ब्रिटनमध्ये चौकशी करेल आणि या कठीण काळात हैदर अलीला शक्य ती सर्व मदत करेल.

Advertisement

हैदर अली कोण आहे?

हैदर अलीचा जन्म 2 ऑक्टोबर 2000 रोजी पाकिस्तानमधील अटक शहरात झाला होता. तो उजव्या हाताचा बॅटर आहे आणि मीडल ऑर्डरमध्ये खेळतो.

( नक्की वाचा : WCL : टीम इंडियाचा ऐतिहासिक निर्णय, पाकिस्तानविरुद्ध सेमी फायनल खेळण्यास दिला नकार! )
 

त्याने आत्तापर्यंत पाकिस्तानसाठी 2 वनडे आणि 35 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 2 वनडे सामन्यांमध्ये त्याने 21.00 च्या सरासरीने 42 रन्स केले आहेत. , तर 32 टी20 इनिंगमध्ये त्याने 17.41 च्या सरासरीने 505 रन्स केले आहेत. गेल्या काही काळापासून खराब कामगिरीमुळे तो राष्ट्रीय संघातून बाहेर आहे.

Advertisement
Topics mentioned in this article