पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. स्वप्नीलच्या गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ आता त्याला मिळू लागलं आहे. मध्य रेल्वेने स्वप्नीलला मोठं गिफ्ट दिलं आहे. मध्य रेल्वेने स्वप्नीलचं अभिनंदन करत त्याच्या पदोन्नतीची देखील घोषणा केली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकमधील स्वप्नील कुसळेच्या कामगिरीच्या आधारे त्याला तिकीट परीक्षक (TTE) पदावरून मुंबईतील स्पोर्ट्स सेलचे विशेष कार्याधिकारी (OSD) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. स्वप्नील कुसळेच्या बढतीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
(नक्की वाचा - Paris Olympic: स्वप्नील कुसाळेच्या स्वागताचा प्लॅन ठरला, सरकारने जाहीर केले 1 कोटींचे बक्षिस)
स्वप्नील कुसाळे 2015 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 'कमर्शियल कम तिकीट लिपिक' म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाला होता. याआधी मध्य रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते की, ' स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या पदकतालिकेत ही केवळ भर नाही, तर भारतीय नेमबाजी खेळातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्वप्नीलने आपली ओळख निर्माण केली आहे.
(नक्की वाचा - कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी')
स्वप्नीलचा पगार किती वाढला?
अलीकडेपर्यंत रेल्वेत टीटीआय म्हणून कार्यरत असलेले स्वप्नील कुसाळे याच्या महिन्याला पगारातही भरघोस वाढ झाली आहे. टीटीई पदावर असताना स्वप्नीलला जवळपास 70 हजार रुपये वेतन मिळत होते. मात्र आता बढतीनंतर त्यांचा पगार दुप्पटीने वाढणार आहे. ओएसडी पदासाठी स्वप्नीलला दरमहा जवळपास 1 लाख 40 हजार रुपये पगार मिळेल.