Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर मात

आजच्या सामन्यात भारताकडून अभिषेकने 18 व्या मिनिटाला तर कर्णधार हरमनप्रित सिंहने 13 आणि 33 व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रेलिया संघाकडून टॉम ग्रेग आमि ब्लेक गोवर्सने प्रत्येकी एक-एक गोल केला.

Advertisement
Read Time: 2 mins

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतील हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय हॉकी संघाने आज शेवटचा ग्रुप सामना खेळला. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 ने पराभव केला. भारतीय हॉकीच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. 1972 साली भारताने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला शेवटचं हरवलं होतं. त्यानंतर 1976 साली ऑलिम्पिकमध्ये अॅस्ट्रोटर्फ मैदानं आणली गेली, ज्यावर हॉकी सामने खेळवले जाऊ लागले. तेव्हापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्णधार हरमनप्रीत चमकला

आजच्या सामन्यात भारताकडून अभिषेकने 18 व्या मिनिटाला तर कर्णधार हरमनप्रीत सिंहने 13 आणि 33 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. ऑस्ट्रेलिया संघाकडून टॉम ग्रेग आमि ब्लेक गोवर्सने प्रत्येकी एक-एक गोल केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.  एकून आठ संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे हॉकी संघाकडूनी आता पदकाची आशा आहे. 

(नक्की वाचा - IPL 2025 : धोनीच्या भवितव्याला BCCI च्या नियमाचा अडथळा, आजच्या बैठकीत होणार निर्णय?)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हा गट खूपच कठीण होता, कारण बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांशी स्पर्धा होती. बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय हॉकी संघाने जोरदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतासाठी मोठा अडथळा मानला जात होता. या विजयामुळे भारतीय हॉकी संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे.

( नक्की वाचा : धोनी IPL मधून कधी रिटायर होणार? CSK च्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा )

हॉकी संघाची आतापर्यंतची कामगिरी

याआधी भारताने बी ग्रुपमध्ये न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. यानंतर आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article