PV Sindhu on Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. त्यावेळी विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला होता. विनोद कांबळीला स्वत:च्या पायावरही उभं राहता येत नव्हतं. यावर भारताची स्टार बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू हिने प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'एनडीटीव्ही'शी बोलताना पीव्ही सिंधून म्हटलं की, "विनोद कांबळी यांचा व्हिडीओ पाहून मला खूप वाईट वाटलं. आपल्या अवतीभोवती चांगले लोक असणे खूप गरजेचं आहे. आयुष्यात चढ-उतार येत असतात. मात्र यासाठी आपण सावध असणे आवश्यक आहे. म्हणूनच आयुष्यात आपल्याला मार्गदर्शन करणारे सोबत असणे गरजेचं आहे."
(नक्की वाचा- Vinod Kambli : विनोद कांबळीचा फोन दुकानदाराच्या ताब्यात, पैसे दिले नाहीत तर घरही जाणार!)
विनोद कांबळी यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की, "आपल्याकडे असलेल्या पैशांचं योग्य नियोजन करणे आवश्यक असते. भविष्यात आपल्याल उपयोगी पडेल अशा पद्धतीने गुंतवणूक करावी. म्हणूनच मी सर्वांना सांगते की योग्य आणि काळजीपूर्वक गुंतवणूक करा आणि तुमच्या पैशाची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळला पाहिजे."
(नक्की वाचा - विनोद कांबळीच्या 'त्या' व्हिडिओत कौतुक सचिनचं, मात्र मदतीसाठी 'देव' धावला!)
"खेळाडू म्हणून तुम्ही उत्तम असता तेव्हा तुम्हाला सपोर्टर्सकडून पैसे मिळतात. त्यावेळी तुम्हाला पैशांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यावेळी पैशांचे योग्य नियोजन केले पाहिजे. कर वेळेत भरला पाहिजे, अन्यथा तुम्ही संकटात सापडू शकता. माझे आई-वडील आणि माझे पती यांच्यावर माझ्या गुंतवणुकीची जबाबदारी आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते मी आजवर कोणत्याही आर्थिक समस्येत अडकली नाही."