'BCCI शी चर्चा झालीच नव्हती,' 'या' खेळाडूच्या निवडीमुळे अश्विननं केली निवृत्तीची घाई?

R. Ashwin : 'माझी आता या सीरिजमध्ये गरज नसेल तर खेळामधून निवृत्ती घेणे कधीही चांगले,' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी अश्विननं रोहित शर्माला या शब्दामध्ये त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

R. Ashwin Retirement : 'माझी आता या सीरिजमध्ये गरज नसेल तर खेळामधून निवृत्ती घेणे कधीही चांगले,' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी अश्विननं रोहित शर्माला या शब्दामध्ये त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. गेल्या 14 वर्षांपासून टीम इंडियाचा सदस्य असलेल्या अश्विननं कुणाला त्याच्या निवृत्तीची चर्चाही करु न देता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

न्यूझीलंडविरुद्ध भारतामध्ये झालेल्या सीरिजनंतरच अश्विननं निवृत्ती घेण्याचा विचार नक्की केला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. टीम इंडियाचा त्या सीरिजमध्ये 0-3 असा धक्कादायक पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधील प्लेईंग 11 मध्ये जागा नसेल तर माझी ऑस्ट्रेलियात जाण्याची इच्छा नाही, असं 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात आलं. रोहित शर्माच्या सूचनेनंतर अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये अश्विनला खेळवण्यात आले. तर गाबामध्ये बुधवारी संपलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा हा एकमेव स्पिनर खेळला. या सीरिजमधील आगामी दोन टेस्ट मेलबर्न आणि सिडनीमध्ये होणार आहेत. त्या टेस्टमधील प्लेईंग 11 कशी असेल याबाबत काहीही कल्पना नसल्याचं रोहितनं सांगितलं. 

( नक्की वाचा :  'माझी गरज नसेल तर...' आर. अश्विनचं निवृत्तीपूर्वी रोहितशी झालेलं संभाषण उघड )

निवड समितीकडून कोणतीही घाई करण्यात आलेली नव्हती. अश्विन हा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज व्यक्ती आहे. त्याला त्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर 'पीटीआय'ला दिली आहे. 

Advertisement

टीम इंडियाची पुढील टेस्ट सीरिज इंग्लंडमध्ये (जून ते ऑगस्ट) आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीम दोनपेक्षा जास्त स्पेशालिस्ट स्पिनर्स खेळवण्याची शक्यता नाही. टीम इंडियाची पुढील होम सीरिज ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आहे. 

त्यामुळे भारतामधील पुढील टेस्ट सीरिजला अजून 10 महिने शिल्लक आहेत. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' चे हे पर्व संपल्यानंतर 2027 साठी तयारी सुरु होईल. अश्विन त्यावेळी 40 वर्षांचा असेल. तोपर्यंत भारतीय क्रिकेटमधील स्थित्यंतराचे पर्व संपले असेल अशी आशा आहे. 

Advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज संपण्यापूर्वीच अश्विननं निवृत्तीची घोषणा करत सर्वांना धक्का दिला. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला पहिली पसंती देण्याच्या निर्णयानं अश्विन दुखावला गेला, अशी चर्चा आता सुरु आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : 'तू मला सांगितलंस तेव्हा...' अश्विनचा निर्णय समजताच हळवा झाला विराट, मित्राला दिल्या भावुक शुभेच्छा )

मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही खेळाचा सतत अभ्यास करणाऱ्या अश्विनला आपल्या भविष्याचा अंदाज आला असावा. त्यामुळेच त्यानं सीरिज संपण्यापूर्वीच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असावा, असं मानलं जातंय. 

538 टेस्ट विकेट्स घेणाऱ्या 38 वर्षांच्या अश्विननं आजवर अनेकदा मैदानात आघाडीवर राहून भारतीय बॉलिंगचा नेतृत्त्व केलंय. तो अनेक वर्षांपासून टेस्ट टीममधील भारताचा पहिल्या पसंतीचा स्पिनर होता. आता कारकिर्दीच्या या टप्प्यात फक्त ड्रेसिंग रुममध्ये राखीव खेळाडूंमध्ये बसण्याची कल्पना अश्विनला पटली नसावी.

न्यूझीलंड विरुद्ध भारतामध्ये झालेली टेस्ट सीरिज अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकरच संपणार आहे, याची नांदी होती. त्या सीरिजमधील शेवटच्या दोन टेस्ट तर पुणे आणि मुंबईत झाल्या. अश्विनच्या बॉलिंगसाठी अगदी आदर्श अशा तेथील खेळपट्ट्या होत्या. त्यानंतरही अश्विनला संपूर्ण सीरिजमध्ये फक्त 9 विकेट्स मिळाल्या. अश्विनचा वारसदार समजल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनं पुणे टेस्टमध्ये 12 विकेट्स घेतल्या. त्या टेस्टमध्ये अश्विनला 5 विकेट्स मिळाल्या. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या दरम्यान रोहित शर्मा उपस्थित नव्हता. पर्थ टेस्टमधील प्लेईंग 11 ही हेड कोच गौतम गंभीरच्या सल्ल्यानुसार निवडण्यात आली होती. त्याचवेळी टीम मॅनेजमेंटचा नंबर 1 ऑफ स्पिनर कोण आहे याचे संकेत अश्विनला मिळाले होते. तो स्पिनर अश्विन नाही याचे संकेत पर्थमध्ये मिळाले होते.  

रोहित शर्मा भारतीय टीममध्ये दाखल झाल्यानंतर त्यानं अ‍ॅडलेड टेस्ट खेळण्यासाठी अश्विनचं मन वळवलं. मी पर्थमध्ये आल्यानंतर त्याच्याशी बोललो. त्याला कसंतरी पिंक बॉल टेस्ट खेळण्यास कयार केलं. माझी सीरिजमध्ये गरज नसेल तर मी खेळातून निवृत्त होते, असं अश्विननं सांगितल्याची माहिती टीम इंडियाच्या कॅप्टननं दिली. 

काही निर्णय खासगी असतात. आपण त्यावर प्रश्न विचारु शकत नाही. एका खेळाडूनं काही ठरवलं असेल तर आपण त्याला त्याचा हक्क दिला पाहिजे. अश्विनसारखा खेळाडू जो नेहमी आमच्यासोबत उभा होता, त्याला हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक टीम म्हणून आम्हाला आमच्या सहकाऱ्यानं घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा लागेल. त्याला काय हवंय हे त्याच्या डोक्यात नक्की होतं. टीमनं त्याला पूर्ण साथ दिली, असं रोहित अश्विनच्या निवृत्तीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला होता.

टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया सीरिजमधील उर्वरित टेस्टमध्ये दोन स्पिनर्स खेळवले तरी ते वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजा असतील, असं मानलं जात आहे.भारतीय उपखंडाच्या बाहेर या दोघांची बॅटिंग अश्विनपेक्षा अधिक चांगली मानली जाते. 

महेंद्रसिंह धोनीनं यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज सुरु असतान अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी त्यानं वर्कलोड कमी करुन व्हाईट बॉल क्रिकेटकडं लक्ष देणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. 

अश्विनच्याबाबतीत आपण आता टीमचा मुख्य स्पिनर नाही, ही त्याला जाणीव झाली होती. त्यामुळेच अश्विननं निवृत्ती जाहीर केली.