दिलदार द्रविड! राहुल द्रविडने स्वत:च्या बक्षिसाची रक्कम केली कमी

बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, राहुल द्रविडला 5 कोटी तर इतर प्रशिक्षकांना अडीच कोटी देणार आहे. मात्र द्रविडने आपल्या इतर प्रशिक्षकांप्रमाणे अडीच कोटी रुपये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला जेंटलमन का म्हणतात, हे त्याने त्याच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला बीसीसीआयने 125 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. यामध्ये प्रशिक्षकांना देण्यात आलेली बक्षिसाची रक्कम वेगवेगळी आहे. मात्र आता द्रविडने सर्वांना समान रक्कम देण्याची मागणी केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राहुल द्रविडने स्वत:ची बक्षिसाची रक्कम यासाठी कमी केली. त्यामुळे द्रविड आता 5 कोटींऐवजी फक्त अडीच कोटी रुपयेच घेणार आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग प्रशिक्षकांना समान अडीच कोटी रुपये देण्याची मागणी द्रविड केली आहे. 

बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, राहुल द्रविडला 5 कोटी तर इतर प्रशिक्षकांना अडीच कोटी देणार आहे. मात्र द्रविडने आपल्या इतर प्रशिक्षकांप्रमाणे अडीच कोटी रुपये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

(नक्की वाचा- अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच)

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवढी रक्कम इतर प्रशिक्षकांना मिळाली तेवढीच रक्कम राहुल द्रविडला हवी आहे. बीसीसीआय देखील द्रविडच्या निर्णयाचा सन्मान करत आहे. 

Advertisement

द्रविडने 2018 च्या अंडर -19 वर्ल्ड कप विजेत्या संघांचा प्रशिक्षक असतानाही असंच केलं होतं. त्यावेळी द्रविडला 50 लाख रुपयांची रक्कम मिळणार होती.मात्र त्यावेळी देखील द्रविडने जास्त रक्कम घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर बीसीसीआयने सर्व प्रशिक्षकांना समान रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता.  

(नक्की वाचा- क्रिकेटपटूंना 11 कोटी बक्षीस, मल्लांचे तुटपुंजे मानधनही थकीत; कोल्हापूरातून संताप व्यक्त)

कसं होणार BCCI कडून मिळणाऱ्या 125 कोटींचं वाटप?

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सर्व खेळाडूंना 5-5 कोटी रुपये मिळणार आहे. तर अन्य कोचिंग स्टाफला (बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग) यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपये मिळतील. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि अन्य सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी बक्षीस मिळेल. कंडिशनिंग कोच, फिजियो आणि अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळतील.राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षीस मिळेल. 

Advertisement