जाहिरात
Story ProgressBack

अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.

Read Time: 2 mins
अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच
मुंबई:

Gautam Gambhir Appointed Indian Cricket Team Head Coach : भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. बीसीआयनं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गंभीरच्या नावाची घोषणा केलीय. टीम इंडियाचे मावळते हेड राहुल द्रविडचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर समाप्त झाला आहे. 

बीसीसीआयच्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टी20 वर्ल्ड कपच्या दरम्यान गौतम गंभीर आणि WV रमन यांची मुलाखत घेतली होती. टी20 वर्ल्ड कपनंतर आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय टीम बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यावेळी मुंबईत परतल्यानंतर सर्वांशी चर्चा करुन नव्या कोचची घोषणा केली जाईल, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं. 
 

जय शहा यांनी मंगळवारी ट्विट करत गौतम गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली. 'मला गौतम गंभीरला भारतीय क्रिकेट टीमचा नवा मुख्य कोच म्हणून स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. आधुनिक क्रिकेट वेगानं विकसित होत आहे. गौतमनं हे बदलतं चित्रं जवळून पाहिलंय. त्यानं संपूर्ण कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत सर्वोत्तम प्रदर्शन केलंय. भारतीय क्रिकेटला पुढं नेण्यासाठी गौतम गंभीर योग्य  व्यक्ती आहे, असा मला विश्वास आहे,' असं शहा यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : IND vs SL : श्रीलका सीरिजसाठी रोहित, विराट, बुमराहला विश्रांती, कोण होणार कॅप्टन ? )
 

राहुल द्रविडनं पुन्हा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिल्यानंतर गौतम गंभीरचं नाव चर्चेत होतं. 2007 मधील टी20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा गौतम गंभीर मुख्य खेळाडू होता. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याच्या कॅप्टनसीमध्ये दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं. तर मेंटॉर म्हणून यंदाच्या सिझनमध्ये अजिंक्यपद पटकावलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
IND vs SL : श्रीलका सीरिजसाठी रोहित, विराट, बुमराहला विश्रांती, कोण होणार कॅप्टन ?
अखेर शिक्कामोर्तब! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा हेड कोच
rahul dravid demand equal pay for support staff and declines higher bonus for t20 world cup
Next Article
दिलदार द्रविड! राहुल द्रविडने स्वत:च्या बक्षिसाची रक्कम केली कमी
;