Vaibhav Suryavanshi : आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी देशभर चर्चेचा विषय ठरला होता. आता वैभव त्याच्या दहावीच्या निकालावरुन चर्चेत आला आहे. सीबीएसई आणि राज्य बोर्डाचे दहावीचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. दरम्यान, सोशल मीडियावर वेगळी चर्चा जोर धरत आहे. वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर येत नव्हती. त्यामुळे वैभवच्या निकालाच्या चर्चांमध्ये काय तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी खूप उत्सुक आहेत. वैभवच्या फॅन्ससाठी दिसासादायक बातमी म्हणजे वैभव दाहावीला नापास झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. कारण त्याने अजून दहावीची परीक्षा दिलेली नाही. तो नववीचा विद्यार्थी होता.
(नक्की वाचा- IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या स्वप्नात मोठा अडथळा, 3 प्रमुख खेळाडू सोडणार अर्ध्यातून साथ!)
वैभव सूर्यवंशीला आयपीएल लिलावात राजस्थानने घेतल्यापासून तो वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर फिरत राहतात. सध्या सीबीएसई आणि राज्य मंडळाचे निकाल येत आहेत. दरम्यान काहींनी वैभवबाबत अफवा पसरवण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा- RCB चं नशिबच फुटकं, आधी स्पर्धेला स्थगिती आता 'या' गोष्टीने वाढवली चिंता)
वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. वैभव दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला आहे. त्यानंतर, बीसीसीआयने त्याच्या उत्तरपत्रिकांची डीआरएस घेण्याची विनंती केली आहे, अशा मिश्किल पोस्ट देखील सोशल मीडियावर फिरत आहेत. याआधी त्याच्या वयावरुनही तो चर्चेत आला होता. अनेकांनी तो खरंच 14 वर्षांचा आहे, याबाबतही संशय व्यक्त केला होता.