
IPL 2025, Mumbai Indians Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे स्थगित झालेला आयपीएल 2025 चा सिझन 17 मे पासून सुरु होणार आहे. बीसीसीआयनं उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 17 मे पासून उर्वरित सिझन सुरु होणार असून 3 जून रोजी फायनल खेळवली जाईल. 'प्ले ऑफ' चे सामने 29 मे पासून सुरु होतील. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2025 ची फायनल 25 मे रोजी होणार होती. पण, ती आता 9 दिवस उशीरा खेळवली जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएलच्या सुधारित वेळापत्रकानं सर्वच फ्रँचायझींची डोकेदुखी वाढवलीय. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या प्रमुख खेळाडूंना 26 मे पर्यंत आफ्रिकेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) यांच्यात यंदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (ICC World Test Championship Final) होणार आहे.
या फायनलच्या तयारीसाठी दक्षिण आफ्रिका बोर्डानं त्यांच्या प्रमुख खेळाडूंना 26 मे पर्यंत मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयनं विनंती केल्यानंतरही दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची ताठर भूमिका कायम आहे.
( नक्की वाचा : Virat Kohli : 'ज्यांच्याकडं काही सांगण्यासारखं...' विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्कानं सोडलं मौन )
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या या ताठर भूमिकेचा फटका अन्य काही फ्रँचायझीसह मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बसू शकतो. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची टीम यंदा चांगलीच फॉर्मात आहे. त्यांनी आत्तापर्यंत 12 मॅचमध्ये 7 विजयासह 14 पॉईंट्स मिळवले आहेत.
ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची टीम पाँईट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर होती. त्यांना 'प्ले ऑफ' आणि विजेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. पण, मुंबई इंडियन्सचा विकेट किपर बॅटर रायन रिकेल्टन (Ryan Rickelton) आणि फास्ट बॉलर कॉर्बिन बॉश (Corbin Bosch) यांना प्ले ऑफ पूर्वीच परत जाऊ लागू शकते.
इंग्लंडनंही वाढवली डोकेदुखी
मंुंबई इंडियन्सची डोकेदुखी इथंच संपत नाही. इंग्लंडचे प्रमुख खेळाडू देखील आयपीएल 'प्ले ऑफ' खेळण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील (England vs West Indies ODI series) वन-डे सीरिज 29 मे पासून सुरु होत आहे.
इंग्लंडनं या सीरिजसाठी टीम जाहीर केलीय. त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंड विल जॅक्सचा (Will Jacks) समावेश आहे. त्यामुळे जॅक्सला 'प्ले ऑफ' पूर्वी मायदेशी परतावं लागेल. त्याचाही मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world