Rajeev Shukla : राजीव शुक्ला BCCI चे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता, रोजर बिन्नी पद का सोडणार?

राजीव शुक्ला यशस्वी पत्रकारासह यशस्वी राजकीय नेता राहिले आहेत. आता ते क्रिकेट प्रशासक म्हणूनही बऱ्याअंशी यशस्वी राहिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

बीसीसीआचे विद्यमान उपाध्यक्ष रोजर बिन्नी यांच्यानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून राजीव शुक्ला पदभार स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौरभ गांगुलीनंतर रोजर बिन्नी बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष झाले होते. ((Rajeev Shukla Will be new president) ) बिन्नी हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना भारताने टी20  वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिळवण्यात यशस्वी ठरले होते. बिन्नी यांचा कार्यकाळ यशस्वी राहिला आहे. 

बीसीसीआय अध्यक्षपदाच्या वयाच्या नियमांमुळे बिन्नी यांना पद सोडावं लागणार आहे. नियमांनुसार, वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यावर बीसीसीआय अध्यक्षाला पद सोडावं लागतं. भारतीय टीमचे माजी खेळाडू रोजर बिन्नी 19 जुलै, 2025 रोजी 70 वर्षांचे होतील. यानंतर ते निवृत्त होतील. अशा परिस्थितीत राजीव शुक्ला अध्यक्ष होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोजर बिन्नी २०२२ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपदी विराजमान झाले होते. बिन्नीने सौरव गांगुलीला रिप्लेस केला होता. बिन्नी १९८३ मध्ये भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. वर्ल्ड कप १९८३ मध्ये बिन्नीने जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि १८ विकेट घेण्यात यशस्वी राहिले होते. दुसरीकडे राजीव शुक्ला २०२० मध्ये बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदावर आहेत. त्यांनी २०१७ पर्यंत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि २०१८ पर्यंत इंडियन प्रीमियर लीगच्या अध्यक्षपदावर काम केलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Rinku Singh Net Worth : खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत लग्न ठरलेल्या रिंकूची संपत्ती किती?

बिन्नी यांच्या जन्मदिनी (१९ जुलै) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र योजनेनुसार, सर्वकाही योग्य झालं तर शुक्ला या जुलै महिन्यात बीसीसीआयची जबाबदारी स्वीकारतील. 

कोण आहेत राजीव शुक्ला? 

राजीव शुक्ला यशस्वी पत्रकारासह यशस्वी राजकीय नेता राहिले आहेत. आता ते क्रिकेट प्रशासक म्हणूनही बऱ्याअंशी यशस्वी राहिले आहेत. राजीव शुक्ला यांचा जन्म १३ सप्टेंबर, १९५९ रोजी झाला. राजकारण आणि पत्रकारितेनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी बीसीसीआयच्या विविध समित्यांमध्ये काम केले आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article