IND vs ENG : रविंद्र जडेजानं दुसऱ्या टेस्टमध्ये मोडला मोठा नियम, पण BCCI करणार माफ! कारण काय?

India vs England 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एजबस्टन टेस्टमध्ये रविंद्र जडेजानं BCCI चा नियम मोडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ravindra Jadeja : बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लागू केलेला नियम जडेजानं मोडला.

India vs England 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टनमध्ये दुसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियानं 587 रन्सचा दमदार खेळ केला. कॅप्टन शुबमन गिलनं 269 रन्सची खेळी केली. त्याला रविंद्र जडेजानं 89 रन करत चांगली चांगली साथ दिली. जडेजा आणि गिल यांनी सहाव्या विकेटसाठी 203 रन्सची महत्त्वपूर्व भागिदारी केली. जडेजानं टीमला गरज असताना झुंजार खेळी केली. पण, त्याचवेळी त्यानं एक नियम मोडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणता नियम मोडला?

बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर लागू केलेला एक नियम जडेजानं मोडला आहे. या नियमानुसार टीम इंडियाच्या खेळाडूंना मैदानावर स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नाही. जडेजा दुसऱ्या दिवशी एकटाच लवकर मैदानात पोहोचला होता. त्यानं इनिंगची सुरुवात करण्यापूर्वी बॅटिंगचा सराव केला. जडेजानं हा नियम मोडला असला तरी त्याला शिक्षा होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.  

( नक्की वाचा:  Shubman Gill: गिलविरुद्ध इंग्रजांचा रडीचा डाव, टीम इंडियाच्या कॅप्टननं घातले दात घशात! पाहा Video )

पहिल्या दिवसाच्या अखेरीस जडेजा 41 रन्सवर नाबाद होता, तर भारताचा कॅप्टन शुभमन गिल दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची बॅटिंग दोन्ही इनिंगमध्ये गडगडली होती. ते लक्षात घेऊन नव्या बॉलचा धोका कमी करायचा होता, असं जडेजानं सांगितलं.

Advertisement

बॉल नवीन असल्यानं मला पुढे जाऊन अतिरिक्त बॅटिंगचा सराव करणे आवश्यक आहे, असे वाटले, असं जडेजानं ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं.  मला वाटले की मी नवीन बॉल खेळू शकलो तर उर्वरित इनिंगसाठी ते सोपे होईल. नशिबानं मी दुपारच्या लंचपर्यंत बॅटिंग करु शकलो. त्यानंतर वॉशी (वॉशिंग्टन सुंदर) नेही शुबमनसोबत चांगली बॅटिंग केली, असं जडेजानं स्पष्ट केलं. 

टीमला तुमची गरज असताना तुम्ही बॅटनं योगदान दिलं त्यावेळी आनंद होतो, अशी भावना जडेजानं व्यक्त केली. 

Topics mentioned in this article