Ravindra Jadeja : जडेजाच्या पत्नीनेच केला भारतीय खेळाडूंच्या व्यसनांचा पर्दाफाश; रिवाबांच्या खुलाश्यानं खळबळ

Ravindra Jadeja Wife Rivaba Jadeja : गुजरातमधील मंत्री आणि टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी टीम इंडियामधील खेळाडूंबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ravindra Jadeja Wife Rivaba Jadeja : गुजरातमधील मंत्री आणि टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी टीम इंडियामधील खेळाडूंच्या शिस्तीबद्दल  एक धक्कादायक वक्तव्य करत मोठा वाद निर्माण केला आहे. गुजरातमधील द्वारकामध्ये झालेल्या  एका कार्यक्रमात बोलताना रिवाबा जडेजा यांनी  त्यांच्या पतीच्या शिस्तीचे कौतुक करताना संघातील 'व्यसनां'बद्दल भाष्य केले, ज्यामुळे उच्च-प्रोफाइल ऍथलीट्ससमोर असलेल्या नैतिक आव्हानांवर एक वेगळाच प्रकाश पडला आहे.

काय म्हणाल्या रिवाबा जडेजा?

रिवाबा जडेजा यांनी सांगितलं की, "माझ्या पतीला, क्रिकेटर रविंद्र जडेजाला, क्रिकेट खेळण्यासाठी लंडन, दुबई आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्ये प्रवास करावा लागतो. "इतके असूनही, आजपर्यंत त्यानं कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा वाईट सवय लागून दिली नाही, कारण त्याला त्याची जबाबदारी माहीत आहे. संघातील उर्वरित सर्वजण व्यसनात गुंतलेले असतात,त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही."

( नक्की वाचा : फक्त 438 रुपयांमध्ये मिळतंय T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट,'या' पद्धतीनं करा घरबसल्या बुक )

टीम इंडियाच्या खेळाडूंवर थेट आरोप

रिवाबा जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभर प्रवास करणाऱ्या उच्चभ्रू क्रिकेटपटूंच्या आयुष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित केले. त्या म्हणाल्या, "माझा नवरा 12 वर्षांपासून घरापासून दूर आहे; त्याला जे हवे ते तो करू शकतो, पण त्याला त्याच्या नैतिक कर्तव्याची जाणीव आहे. त्याला काय करायचे आहे हे माहीत आहे." पण टीममधील उर्वरित सर्वजण व्यसनात गुंतलेले असतात' या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आले आहे. 

जडेजाच्या कारकिर्दीतील नवे पर्व

रविंद्र जडेजाच्या क्रिकेट कारकिर्दीमधील एक मोठा बदल होत असताना हे वक्तव्य आलं आहे. जडेजा टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीममधील महत्त्वाचा खेळाडू असला तरी त्यानं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Advertisement

त्याच्या आयपीएल टीममध्ये आता बदल झाला आहे. तो आयपीएल कारकिर्दीच्या उत्तरार्धात  एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. एका महत्त्वपूर्ण ट्रेड डेव्हलपमेंटमध्ये, जडेजाला राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड करण्यात आले आहे, जिथे त्यानं आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. या बदलामुळे त्याची चेन्नई सुपर किंग्समधील (CSK) त्याचा अत्यंत यशस्वी आणि इमोशनल प्रवास समाप्त झाला आहे. 

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट )