Rishabh Pant IPL Hundred : आयपीएलच्या ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतनं शेवटच्या मॅचमध्ये पैसा वसूल खेळ केला. त्यानं आयपीएल 2025 (IPL 2025) मधील शेवटच्या लीग मॅचमध्ये दमदार सेंच्युरी झळकावली. लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल २०२५ मधील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसोबत (LSG vs RCB) आहे. या मॅचमध्ये पंतनं 61 बॉलमध्ये नाबाद 118 रन्स केले. त्यानं ही खेळी 11 फोर आणि 8 सिक्सर्ससह सजवली. पंतची आयपीएल कारकिर्दीमधील ही दुसरी सेंच्युरी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर फ्रँचायझीने त्याच्याकडं कॅप्टनशीपची जबाबदारीही दिली. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या लखनौच्या टीमला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, या सिझनमध्ये पंतची बॅट पूर्णपणे अपयशी ठरली. लखनौला दोन मॅच बाकी असतानाच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
( नक्की वाचा : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं वाढवलं टेन्शन! MCA ची मनधरणीसाठी धावाधाव )
शेवटच्या मॅचमध्ये चमकला
लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल 2025 मधील शेवटच्या मॅचमध्ये ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरला. पहिल्या बॉलपासून पंत लयीत दिसत होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानात आलेल्या पंतने चौथ्या ओव्हरमध्ये यश दयालविरुद्ध 18 रन्स काढले. या सिझननंतर त्याने दोन फोर आणि एक सिक्स लगावला. त्यानंतर पंतने संपूर्ण इनिंगमध्ये वर्चस्व गाजवलं. प्रत्येक बॉलरविरुद्ध त्यानं सहजपणे मनासारखे फटके मारले.
ऋषभ पंतने या सिझनमधील एकमेव हाफ सेंच्युरी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झळकावली होती. त्यानंतर त्यानं आरसीबीविरुद्ध सेंच्युरी झळकावली. त्यानं 29 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर 54 बॉलमध्ये सेंच्युरी केली. या सेंच्युरीनंतर पंतनं हटके स्टाईलनं मैदानात सेलिब्रेशन केलं.
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या 13 मॅचमध्ये ऋषभ पंतने फक्त 151 रन्स केले होते. त्याने हे रन्स 13.73 च्या सरासरीनं आण् 107.09 च्या स्ट्राईक रेटनं केले होते. त्यानं शेवटच्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध 193.44 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली. पंत फॉर्मात येणं ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. भारताला पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. तिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार आहे. पंत टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन आहे.