टीम इंडियाच्या T20 टीमचा ओपनर संजू सॅमसनचे (Sanju Samson) वडील विश्वनाथ सॅमसन (Viswanath Samson) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलाच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल 4 दिग्गजांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
संजू सॅमसननं नुकताच सलग दोन टी20 इंटरनॅशनलमध्ये सेंच्युरी झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू हा बहुमान मिळवलाय. पण, यापूर्वी त्याला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला भारतीय टीमममध्ये नियमित जागा मिळाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विश्वनाथ सॅमसन यांनी या व्हिडिओमध्ये संजूची आंतरराष्ट्रीय कारकिर्द खराब करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या टीम इंडियाच्या माजी कॅप्टनसह माजी कोच राहुल द्रविडला जबाबदार धरलं आहे.
' 3-4 जणांनी माझ्या मुलाच्या कारकिर्दीमधील 10 वर्ष खराब केली. कॅप्टन धोनीजी विराट (कोहली) जी, रोहित (शर्मा) जी आणि कोच (राहुल) द्रविडजी या चार जणांची माझ्या मुलाच्या आयुष्यातील 10 वर्ष खराब केली. पण, त्यांनी जितका त्याला त्रास दिला तितका तो कणखर बनला आहे,' असं विश्वनाथ यांनी 'मीडिया वन' या मल्याळम न्यूज चॅनेलला बोलताना सांगितलं.
यावर्षी T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा संजू सॅमसन सदस्य होता. पण, त्याला वॉर्मअप गेममध्ये चांगली कामगिरी करुनही संपूर्ण स्पर्धेत एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर सूर्यकुमार यादव कॅप्टन आणि गौतम गंभीर हेड कोच झाल्यानंतर संजूला नियमित संधी मिळाली.
सूर्यकुमार आणि गंभीरनं दाखवलेला विश्वास संजूनं सार्थ ठरवला. त्यानं बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलग दोन T20 मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली.
( नक्की वाचा : Rishabh Pant : ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय का घेतला? उघड झालं कारण )
सूर्यानं दिलं आश्वासन
संजू सॅमसननं नुकताचं सूर्यकुमार यादवं त्याला दिलेल्या आश्वासनाबाबत खुलासा केला आहे. सूर्यानं मला सलग 7 T20 इंटरनॅशनलमध्ये काहीही निकाल लागला तरी ओपनर म्हणून संधी मिळणार असं आश्वासन दिल्याचं संजूनं सांगितलं.
'दुलिप ट्रॉफीचा सामना सुरु असताना सूर्या माझ्याकडं आला आणि त्यानं मला तू पुढील सात मॅच खेळणार असल्याचं सांगितलं. 'तू पुढच्या सात मॅचमध्ये ओपनिंग करणार आहेस. काहीही झालं तरी मी तुला पाठिंबा देईल. माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच मला इतकं थेट आश्वासन मिळालं. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.' असं संजूनं सांगितलं.