Duleep Trophy : टीम इंडियातील मुंबईकराची जागा धोक्यात, पहिल्या परीक्षेत सपशेल फेल

Sarfaraz Khan : सरफराजनं टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर चांगली कामगिरी केली होती यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण, टीम इंडियात अनुभवी खेळाडू परतल्यानंतर त्याच्यावर बेंचवर बसण्याची टांगती तलवार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

Sarfaraz Khan was Out Cheaply: देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं रन केल्यानंतर मुंबईकर सरफराज खानला टीम इंडियात संधी मिळाली. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सरफराजला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. आता आगामी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यासाठी सरफराजला आजपासून (गुरुवार 5  सप्टेंबर) सुरु होणाऱ्या दुलिप ट्रॉफीमध्ये दमदार खेळ करण्याची गरज आहे. पण, पहिल्या परीक्षेत तो फेल ठरला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रमुख भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या दुलिप ट्रॉफीमधील इंडिया 'ए' विरुद्ध  इंडिया 'बी' यांच्यातील मॅच बंगळुरुमध्ये सुरु आहे. या मॅचमधील पहिल्या दिवशी इंडिया 'बी' कडून खेळणारा सरफराज स्वस्तात परतला. चौथ्या क्रमांकावर आलेला सरफराज 35 बॉलमध्ये 9 रन काढून आऊट झाला. 

कुणाशी स्पर्धा?

सरफराजनं टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर चांगली कामगिरी केली होती यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण, टीम इंडियात अनुभवी खेळाडू परतल्यानंतर त्याच्यावर बेंचवर बसण्याची टांगती तलवार आहे. दुलिप ट्रॉफीत दमदार कामगिरी करुन सरफराज टीममधील जागा टिकवेल, असा त्याच्या फॅन्सना विश्वास आहे. पण, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याची कामगिरी निराशाजनक होती. 

Advertisement

सरफराजला टीम इंडियाचा तरुण बॉलर आवेश खाननं एलबीडब्ल्यू केलं. त्यापूर्वी आवेशनं सरफराजच्या टीमचा कॅप्टन अभिमन्यू इश्वरनलाही (13) आऊट केलं होतं. आवेशच्या बॉलिंगवर इश्वरनचा विकेट किपर ध्रुव जुरेलनं अफलातून कॅच पकडला.  

( नक्की वाचा : 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील? )
 

इंडिया 'A' टीमची कॅप्टनसी शुबमन गिल करतोय. या टीममध्ये मयांक अग्रवाल, केएल राहुल, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि आवेश खान हे प्रमुख खेळाडू आहेत. तर अभिमन्यू इश्वरनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या इंडिया 'B'टीममध्ये यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार यांचा समावेश आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article