Team India : आशिया कपनंतर टीम इंडियात मोठे बदल, रोहित, गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार वन-डे टीमचा कॅप्टन?

Team India Split Captaincy : आशिया कप स्पर्धेनंतर टीम इंडियात मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India :निवड समितीला रोहितला कॅप्टनसीच्या जबाबदारीतून मुक्त करायचे आहे.
मुंबई:

Team India Split Captaincy : आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची निवड नुकतीच झाली आहे. 9 ते 28  सप्टेंबर या काळात UAE मध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निवड आलेल्या टीमवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या टीममध्ये शुबमन गिलचा व्हाईस कॅप्टन म्हणून समावेश करण्यात आला आहे. तो लवकरच सूर्यकुमार यादवकडून या टीमची नेतृत्त्वाची धुरा सांभाळणार असल्याचं मानलं जात आहे. या टीममध्ये श्रेयस अय्यरची निवड झालेली नाही. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं. श्रेयस सध्या चांगलाच फॉर्मात आहे. पण, त्यानंतरही त्याला निराशा सहन करावी लागली.

आशिया कप स्पर्धेसाठी निवड न झालेल्या श्रेयससाठी एक आनंदाची बातमी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयसला वन-डे टीमचा कॅप्टन करण्याचा विचार निवड समिती करत आहे. वन-डे टीमचा दीर्घकालीन कॅप्टन म्हणून श्रेयसच्या नावाचा विचार सुरु आहे. आशिया कप स्पर्धेनंतर लगेच हा निर्णय होऊ शकतो.

रोहित आणि विराटचं काय होणार?

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे वन-डे टीमचे आजी-माजी कॅप्टन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी वन-डे सीरिजनंतर या प्रकारातूनही निवृत्त होतील, अशी चर्चा आहे. या दोघांनाही त्यांच्या वन-डे क्रिकेटमधील भविष्याबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल. पण, निवड समितीला रोहितला कॅप्टनसीच्या जबाबदारीतून मुक्त करायचे आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

( नक्की वाचा : Sanju Samson : संजू सॅमसनसोबत धोका, टीममध्ये निवड पण Playing 11 मध्ये जागा नाही ! कारणही उघड )
 

विराट कोहली (36) आणि रोहित (38), यांनी वन-डे क्रिकेटमध्ये 25,000 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. ते 2027 च्या वन-डे वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतील का? याबद्दल चर्चा आहे.  

Advertisement

विराट आणि रोहित हे वन-डे क्रिकेटमधील 'ऑल टाईम ग्रेट' खेळाडू आहे.  विराटने 302 मॅचमधील 290 इनिंगमध्ये 57.88 च्या सरासरीने 14,181 रन्स केले आहेत. त्यामध्ये 51 सेंच्युरी आणि 74 हाफ सेंच्युरींचा समावेश समावेश आहे. त्याचा सर्वोच्च स्कोअर 183 आहे.

( नक्की वाचा : Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral )
 

दुसरीकडे, रोहितने 272 मॅच खेळल्या आहेत. त्यामधील 265 इनिंगमध्ये 48.76 च्या सरासरीने 11,168 रन्स केले आहेत. रोहितनं 32 सेंच्युरी  आणि 59 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. रोहितनं वन-डे  क्रिकेटमध्ये 3 डबल सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम केलाय. 264 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे.  
 

Advertisement
Topics mentioned in this article