Smriti Mandhana Wedding New Date: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं या तारखेला होणार लग्न?

Smriti Mandhana Wedding New Date: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे या दिवशी होणार लग्न?

जाहिरात
Read Time: 2 mins
Smriti Mandhana Wedding New Date
Smriti Mandhana Insta

Smriti Mandhana Wedding Date: टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचे लग्न होणार होतं, पण स्मृतीचे वडील आणि पलाशचीही प्रकृती अचानक बिघडल्याने लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला. श्रीनिवास मानधना यांना आलेला हृदयविकाराचा झटका, पलाशवर सोशल मीडियाद्वारे होत असलेले फसवणुकीचे आरोप, स्मृतीने सोशल मीडियावरुन लग्नाशी संबंधित डिलिट केलेले फोटो या सर्व घडामोडींदरम्यान हे लग्न मोडलंय की होणार नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.   

स्मृती मानधना आणि पलाशच्या लग्नाची नवी तारीख? 

लग्न मोडल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता सोशल मीडियाद्वारेच नवी माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, स्मृती आणि पलाशचं येत्या 7 डिसेंबर रोजी लग्न होणार असल्याचं म्हटलं जातंय. लग्नसोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबाचे जवळचे नातेवाईकच उपस्थित असतील, अशीही माहिती आहे. पण या वृत्तास दोन्ही कुटुंबाकडून अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. 

लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांसमोर 

दरम्यान लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छल सोमवारी (2 डिसेंबर 2025) पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांसमोर आलाय. यावेळेस कोणत्याही मुद्यावर प्रतिक्रिया देणे त्याने टाळलं. पलाशसोबत त्याची टीम आणि कुटुंबातील सदस्य होते. 

Advertisement

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: कोणीही लग्न करणार नाही, वडिलांना मारले टोमणे... स्मृती मानधनाचा धक्कादायक खुलासा)

स्मृती मानधनाला फसवल्याचा पलाशवर आरोप

काही दिवसांपूर्वी पलाशचे एका महिलेसोबतचे चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच पलाश आणि एका मुलीला संगीतसोहळ्यादरम्यान रंगेहाथ पकडण्यात आलं होतं, अशीही माहिती सोशल मीडियावर पसरली होती. पण अफवांवर दोन्ही कुटुंबाकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

Advertisement

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: लग्नापूर्वी नवा ट्विस्ट, स्मृती मानधनाला पलाश मुच्छलने फसवलं? दुसऱ्या बाईसोबतचं चॅटिंग Viral)

दुसरीकडे पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नसोहळा पुढे ढकलण्यामागील कारण सांगितलं होतं. स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती खराब झाल्याने लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आलाय, अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.