जाहिरात

Smriti Mandhana: लग्नापूर्वी नवा ट्विस्ट, स्मृती मानधनाला पलाश मुच्छलने फसवलं? दुसऱ्या बाईसोबतचं चॅटिंग Viral

Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding: क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आलं. पण खरं कारणं वेगळं आहे का?

Smriti Mandhana: लग्नापूर्वी नवा ट्विस्ट, स्मृती मानधनाला पलाश मुच्छलने फसवलं? दुसऱ्या बाईसोबतचं चॅटिंग Viral
"Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding: स्मृती मानधनाला पलाशने फसवलं?"
Smriti Mandhana And Canva

Did Palaash Muchhal Really Cheat On Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा पार पडणार होता. सोशल मीडियावर संगीत, मेंदी, हळदी समारंभाचे व्हिडीओ-फोटो देखील व्हायरल झाले होते. पण लग्नाच्या काही तासांपूर्वी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक खराब झाली आणि कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्मृतीने लगेचच लग्नाशी संबंधित सर्व फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावरुन डिलिट केले, यामुळे चाहत्यांना अधिकच धक्का बसला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. 

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाशचीही प्रकृती बिघडली

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं. काही तासांनंतर पलाश मुच्छलच्याही प्रकृतीत बिघाड झाला, त्यालाही सांगलीतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या घडामोडींदरम्यान स्मृतीने सोशल मीडियावरील लग्नाशी संबंधित फोटो-व्हिडीओ डिलिट केल्याच्या गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी तिने डायमंड रिंग दाखवत लग्नसोहळ्याची घोषणा करणारा हटके व्हिडीओ शेअर केला होता. पलाशने तिला प्रपोज केल्याचाही व्हिडीओ होता. पण हे दोन्ही व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर आता दिसत नाहीयेत. तेव्हापासूनच सोशल मीडियावर धक्कादायक अफवा पसरू लागल्या आहेत. 

स्मृती मानधनाला पलाश मुच्छल फसवत होता का? 

यादरम्यान इन्स्टाग्राम युजर मेरी डिकोस्टानं पलाशसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. या महिलेने दावा केलाय की हे तिचे आणि पलाशचे चॅट्स आहेत. ज्या अकाउंटवरून स्क्रीनशॉट्स शेअर केले गेले होते, ते अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यात आलंय. पण आता सोशल मीडियावर हे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मे 2025 रोजी करण्यात आलेले हे मेसेज आहेत. तसेच संबंधित महिला पलाशचे रिलेशनशिप स्टेटस तसेच त्याचे स्मृतीवर प्रेम आहे की नाही? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. या व्हायरल मेसेजची NDTV पुष्टी करत नाही. 

Smriti Mandhana Video: लाल गुलाब, डायमंड रिंग... वर्ल्ड कप जिंकला त्याच डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पलाशने स्मृती मानधनाला केलं प्रपोज

(नक्की वाचा: Smriti Mandhana Video: लाल गुलाब, डायमंड रिंग... वर्ल्ड कप जिंकला त्याच डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पलाशने स्मृती मानधनाला केलं प्रपोज)

स्मृती मानधनाने आधीचे फोटो डिलिट केले नाही...

स्मृतीने लग्न समारंभाशी संबंधित फोटो व्हिडीओ डिलिट केले असले तरीही पलाशसोबतचे आधीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.

Smriti Mandhana News: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? नणंदेने मौन सोडत इन्स्टा पोस्ट केली शेअर PHOTO

(नक्की वाचा: Smriti Mandhana News: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न कधी होणार? नणंदेने मौन सोडत इन्स्टा पोस्ट केली शेअर PHOTO)

पलक मुच्छलने सोडलं होते मौन 

सोशल मीडियावरील वेगवेगळ्या गोष्टी पाहता पलाशची बहीण पलकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न पुढे ढकलण्यामागील खरं कारण सांगितलं. "स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आलाय. या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबीयांच्या खासगी गोष्टींचा आदर करावा, अशी तुम्हा सर्वांना विनंती करते", अशी पोस्ट पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छलने सोशल मीडियावर शेअर केली होती.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com