England vs India Test Series 2025: शुबमन गिलच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही देशांच्या (India vs England) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडिया इंग्लंडला सामोरं जात आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) टीम निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
का आहे गांगुली नाराज?
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) समावेश करण्यात आलेला नाही. त्याबद्दल गांगुलीनं नाराजी व्यक्त केली आहे. . श्रेयस गेल्या वर्षभरात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये तो पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक रन्स करणारा बॅटर ठरला.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, श्रेयस मधल्या फळीसाठी प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. श्रेयसची टीम इंडियात निवड करायला हवी होती, असं मत गांगुलीनं व्यक्त केलं.
( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )
'तो गेल्या वर्षभरात त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याला या टीममध्ये असायला हवे होते. गेल्या एक वर्षापासून त्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. तो आता दबावाखाली रन्स करत आहे, जबाबदारी घेत आहे, आणि शॉर्ट बॉल चांगला खेळत आहे. टेस्ट क्रिकेट वेगळे असले तरी, तो काय करू शकतो हे पाहण्यासाठी मी त्याला या सीरिजमध्ये नक्कीच निवडले असते,' असे गांगुलीने RevSportz ला सांगितले.
( नक्की वाचा : 'मी श्रेयस अय्यरला नवरा मानते, त्याच्या दोन मुलांची आई' खळबळजनक दाव्यानंतर Bigg Boss स्पर्धक म्हणते... )
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.