जाहिरात
Story ProgressBack

दक्षिण अफ्रिकेने इतिहास रचला, पहिल्यांदाच गाठली वर्ल्डकप फायनल

या विजयामुळे दक्षिण अफ्रिका पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या फाइनलमध्ये पोहचली आहे.

Read Time: 2 mins
दक्षिण अफ्रिकेने इतिहास रचला, पहिल्यांदाच गाठली वर्ल्डकप फायनल
गयाना:

South Africa vs Afghanistan, Semi Final 1 Cricket Score: त्रिनिदादमध्ये दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानचा नऊ विकेचने दारूण पराभव केला. या विजयामुळे दक्षिण अफ्रिका पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या फाइनलमध्ये पोहचली आहे. प्रथम फलंदाजी करताना  अफगाणिस्तानचा डाव हा फक्त 57 धावांत आटोपला. ही लक्ष्य अफ्रिकेने एक विकेटच्या मोबदल्यात 8.5 ओव्हर्स गाठले. दक्षिण अफ्रिका आता फायनलमध्ये पोहोचली आहे. भारत आणि इंग्लड यांच्यातील विजेत्या बरोबर दक्षिण अफ्रिकेचा सामना होईल.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

दक्षिण अफ्रिकेने हा माफक लक्ष नवव्या षटकातच गाठले. रीजा हेंड्रिक्स याने 25 बॉलमध्ये 3 चौकार आणि  1 षटकार ठोकत 29 धावा केल्या. तर कॅप्टन एडेन मार्कराम याने वन डाऊन येत 21 चेंडूनत 4 चौकारांसह नाबाद 23 काढल्या. तर क्विंटन डिकॉक हा 8 बॉल खेळून केवळ 5 धावा काढत बाद झाला. या विजयामुळे दक्षिण अफ्रिका संघ टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनमध्ये पहिल्यांदाच पोहचला. अफगाणिस्तान संघाचा पराभव झाला असला तरी त्यांनी अप्रतिम खेळ केला. पुर्ण विश्वचषकात त्यांनी आपली छाप सोडली. शिवाय 57 धावांचा पाठलाग करतानाही त्यांनी दक्षिण अफ्रिकेच्या नाकीनऊ आणले.  

अफगाणिस्तान संघानं संपुर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली. मात्र उपांत्य सामन्यात त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला. त्यांना केवळ 56 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानचा संघ जेमतेम 12 ओव्हर्सच खेळू शकला. त्यांचा संपुर्ण संघ  12 ओव्हर्समध्ये तंबूत परतला. अजमतुल्लाह उमरजई वगळता एका ही फलंदाजाला डबल डिजिट धावसंख्या उभारता आली नाही. त्याने दहा धावा केल्या. अफगाणिस्तानच्या संघाला मार्को यानसेन आणि तबरेज शम्सी यांनी खिंडार पाडलं. या दोघांनीही तीन तीन विकेट्स घेतल्या. तर रबाडा आणि एनरिक नोर्किया यांनी दोन दोन विकेट घेतल्या. 

मार्को यानसेन हा'प्लेयर ऑफ द मैच' ठरला. त्याने अफगाणिस्तानच्या संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के देत बॅकफूटवर ठकलले होते. त्याने तीन ओव्हर टाकत सोळा रन्स दिली. त्या बदल्यात त्याने सुरूवातीलाच तीन विकेट घेतल्या. या धक्क्यातून अफगाणिस्तान संघ शेवटपर्यंत सावरला नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचा सूर्यकुमारला दे धक्का! टी-20 मध्ये अव्वल स्थानी
दक्षिण अफ्रिकेने इतिहास रचला, पहिल्यांदाच गाठली वर्ल्डकप फायनल
t20 world cup india vs England key battles rohit-sharma-vs-adil-rashid-kuldeev-yadav-vs-harry-brook-rohit-sharma-vs-jorfra-archer-jos-buttler-vs-jasprit-bumrah
Next Article
IND vs ENG : विराटचा बॅडपॅच संपणार? रोहित शर्माला कुणाचा धोका? वाचा टीम इंडियासमोरची आव्हानं
;