Heinrich Klaasen : सर्वात स्फोटक खेळाडूची अचानक निवृत्ती, क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Heinrich Klaasen : ग्लेन मॅक्सवेलची निवृत्ती ताजी असतानाच आणखी एका आक्रमक क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत खळबळ उडवली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Heinrich Klaasen : क्लासेननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणे हा जागतिक क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. 
मुंबई:

Heinrich Klaasen retired from international cricket: ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) वन-डे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. मॅक्सवेलची निवृत्ती ताजी असतानाच आणखी एका आक्रमक क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत खळबळ उडवली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

जगातील सर्वात आक्रमक बॅटर म्हणून सध्या ओळखखला जात असलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू  हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen Retirement) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्लासेनने कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये क्लासेनला सर्वात स्फोटक बॅटर मानले जाते. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणे हा जागतिक क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. 

( नक्की वाचा : रोहित शर्माच्या विकेटनंतर सेलिब्रेशन का केलं नाही? मोहम्मद सिराजचं उत्तर वाचून वाटेन अभिमान! )
 

क्लासेनने त्याच्या टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त 4 सामने खेळले. त्यात त्यानं 104 रन्स केले. तर वन-डे क्रिकेटमध्ये 60 सामन्यात 2141 रन्स त्याच्या नावावर आहेत. यामध्ये 4 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यानं 58 मॅचमध्ये 1000 रन्स केले. त्यामध्ये 5 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. (Heinrich Klaasen record)

काय म्हणाला क्लासेन?

क्लासेनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. क्लासेनने लिहिले, 'हा माझ्यासाठी दुःखाचा दिवस आहे, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वतःला वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काय सर्वोत्तम आहे, हे ठरवण्यासाठी मला खूप वेळ लागला. हा खरोखरच खूप कठीण निर्णय होता, पण त्याचवेळी मी या निर्णयाशी पूर्णपणे समाधानी आहे.'

Advertisement

दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गजाने पुढे लिहिले, 'पहिल्या दिवसापासून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. आपल्या देशासाठी खेळण्याचे माझे बालपणीचे स्वप्न होते, मी यासाठी पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने काम केले. मी खूप चांगल्या मैत्री आणि नातेसंबंध निर्माण केले आहेत जे मी आयुष्यभर जपून ठेवीन. या प्रवासात मला अनेक अद्भुत मित्र आणि नातेसंबंध लाभले, जे मी आयुष्यभर जपून ठेवीन. क्रिकेटने मला अशा महान लोकांशी भेटवून दिले ज्यांनी माझे आयुष्य बदलले. मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.'

( नक्की वाचा : 'मी टीमला निराश करत होतो', पंजाब किंग्जच्या दिग्गजाची अचानक निवृत्ती )
 

क्लासेन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. पण तो फ्रँचायझी क्रिकेट खेळेल. ही त्याच्या फॅन्ससाठी दिलासादायक बाब आहे. क्लासेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. 
 

Advertisement
Topics mentioned in this article