अमेरिकेनं टी20 वर्ल्ड कपमध्ये धक्कादायक निकाल नोंदवलाय. टेक्सासमध्ये झालेल्या मॅचमध्ये यजमान टीमनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अमेरिकेची टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपसाठी पात्र झालीय. तर पाकिस्तानच्या टीमनं यापूर्वी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. तसंच मागील वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. अमेरिकेचा हा पाकिस्तानवर कोणत्याही फॉर्मेटमधला पहिलाच विजय आहे. या विजयानंतर साहजिकच पाकिस्तानमध्ये पडसाद उमटण्यास सुरुवात झालीय. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) या पराभवाचं दुसऱ्यांवर खापर फोडलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला बाबर ?
'आम्हाला बॅटिंगमध्ये पहिल्या 6 ओव्हर्सचा फायदा उठवता आला नाही. सलग दोन विकेट पडल्यानंतर (Babar Azam angry on Pakistan Team Batting) तुम्ही नेहमी बॅकफुटवर जातात. एक बॅटर म्हणून तुम्हाला चांगली पार्टनरशिप करावी लागते. आम्ही पहिल्या 6 ओव्हर्समध्ये बॉलिंगमध्येही (Babar Azam Angry on Pakistan Bowling) चांगली कामगिरी करु शकलो नाही. त्याचा आम्हाला फटका बसला.
अमेरिकन क्रिकेट टीमला याचं श्रेय जातं. त्यांनी तिन्ही प्रकारात आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. पिचमध्ये दोन्ही बाजूनं थोडासा ओलावा होता. (Babar Azam on Pitch) एक प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला या परिस्थितीचं आकलन आवश्यक आहे,' असं बाबरनं सांगितलं.
( नक्की वाचा : पाकिस्तानला हरवून USA ने रचला इतिहास, अंगावर काटा आणणारा सुपर ओव्हर )
बाबरचा संथ खेळ
अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. त्यांना पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 30 रन करता आले. बाबर आझमनं पॉवर प्लेमध्ये आऊट झाला नाही. पण, त्याला पॉवर प्लेमध्ये 14 बॉल खेळून फक्त 4 रन करता आले. बाबरनं अमेरिकेविरुद्ध 43 बॉलमध्ये 44 रन करता आले. त्याच्या संथ खेळामुळे पाकिस्तानला मोठा स्कोअर करता आला नाही. पाकिस्ताननं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 43 बॉलमध्ये 44 रन्स करता आले.
( नक्की वाचा : अमेरिकेच्या विजयात चमकणारा, कोण आहे सौरभ नेत्रावळकर? )
अमेरिकेनं 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 159 रन करत मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. मोहम्मद आमिरनं सुपर ओव्हरमध्ये (Mohammad Amir Bowling in Super Over) दिशाहीन बॉलिंग करत 18 रन दिले. आमिरनं वाईड बॉलमध्येच 7 रन दिले. त्यानंतर सौरभ नेत्रवलकरनं फक्त 13 रन देत अमेरिकेच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं. अमेरिकेचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.