अफगाणिस्तान जिंकताच संपूर्ण देश रस्त्यावर... असं सेलिब्रेशन तुम्ही कधी पाहिलं नसेल, Video

Afghanistan creates history: दहशतवाद, यादवी युद्ध, तालिबानी शासन या सर्वांमुळे जर्जर झालेल्या अफगाणिस्तानसाठी 25 जून हा ऐतिहासिक दिवस होता.

जाहिरात
Read Time: 1 min
Afghanistan Fans Celebration
मुंबई:

Afghanistan creates history: दहशतवाद, यादवी युद्ध, तालिबानी शासन या सर्वांमुळे जर्जर झालेल्या अफगाणिस्तानसाठी 25 जून हा ऐतिहासिक दिवस होता. अफगाणिस्तान क्रिकेट टीमनं टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) सेमी फायनल गाठली. त्यांनी बांगलादेशचा 8 रननं पराभव करत सेमी फायनल गाठली. राशिद खानच्या या टीमनं यापूर्वी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

अफगाणिस्ताननं सेमी फायनलमध्ये प्रवेश करताच संपूर्ण देशात आनंदाला उधाण आलं आहे. फक्त राजधानी काबूल नाही तर देशातील सर्वच भागातील नागरिकांनी सेलिब्रेशन सुरु केलं. त्यांनी रस्त्यावर उतरुन टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाल्याचा आनंद साजरा केला. 

अफगाणिस्तान सेमी फायलमध्ये पोहोचल्यानंतर देशातील रस्त्यावर त्याचं सेलिब्रेशन सुरु झालं. प्रशासनानं ही गर्दी हटवण्याचे प्रयत्न केले. पण, लोकं ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. 

Advertisement

अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर सुरु असलेली ही रंगांची उधळण अनुभवा

हा व्हिडिओ विजयाचा सर्व आनंद वर्णन करत आहे. 

हा अफगाणिस्तानच्या नगरहार प्रांतामधील फोटो आहे. अफगाणिस्ताननं मॅच जिंकताच लोकं चौका-चौकात जमा होऊन आनंद साजरा करु लागले. हा फोटो ऐतिहासिक आहे. 

अफगाणिस्तानमधील जलादाबाद शहरातील सेलिब्रेशन पाहा

Advertisement

फॅन्सची गर्दी पांगवण्यासाठी वॉटर ब्रिगेडनं त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला. पण, फॅन्सवर त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. या प्रकारचं सेलिब्रेशन तुम्ही कुठंच पाहिलं नसेल.

Topics mentioned in this article