टी20 वर्ल्ड कप 2024 मधील पहिला सामना पाकिस्तानने गमावला आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये मोठा उलटफेर करीत पाकिस्तानला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे यूएसए टीमने सुपर ओव्हरचा सामना देखील जिंकला. अमेरिकेच्या या यशानंतर ग्रुप ए मध्ये पॉइंट टेबलचं संपूर्ण समीकरणच बदललं आहे. अमेरिका भारताला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानला आता टूर्नामेंटच्या बाहेर होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
पाकिस्तान आणि अमेरिकेचा सामना गुरुवारी रात्री उशीरा सुरू होता. पाकिस्तानने आधी बॅटिंग घेत सात विकेटवर 159 रन केले. याला प्रत्युत्तर देत अमेरिकेने 20 ओव्हरमध्ये तीन विकेटवर 159 रन केले. मॅच टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हर खेळण्यात आला. अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी घेत 18 रन केले. पाकिस्तानची टीम यावेळी फक्त 13 रन घेऊ शकली. यामुळे पाकिस्तानच्या टीमला या सामन्यात अपयशाला सामोरं जावं लागलं.
पॉइंट टेबलमध्ये अमेरिका टॉपवर..
अमेरिकेचं टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये हे दुसरं यश आहे. या यशामुळे त्यांना चार पॉइंट मिळाले आहेत. आता ते पॉइंट टेबलमधील ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. भारतीय टीम या एका विजयाने 2 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे आहे. पाकिस्तान (0) तिसऱ्या, कॅनडा चौथ्या आणि आयरलँड (0) पाचव्या क्रमांकावर आहे.