T20 WC 2024 : टीम निवडीमध्ये चूक झाली! आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माची कबुली?

Rohit Sharma : आयर्लंड विरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मानं न्यूयॉर्कमधील पिचवर नाराजी व्यक्त करत टीम निवडीत चूक झाल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

Advertisement
Read Time: 2 mins
Rohit Sharma on New York Pitch T20 WC 2024
मुंबई:

टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपची (T20 WC 2024) सुरुवात विजयानं केली आहे. न्यूयॉर्कमधील नसाऊ कौंटी पिचवर बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतानं आयर्लंडचा 8 विकेट्सनं पराभव केला. आर्यलंडनं दिलेलं 97 रन्सचं आव्हान टीम इंडियानं 46 बॉल आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. भारताकडून कॅप्टन रोहित शर्मानं सर्वाधिक 52 रन केले. या विजयानंतर रोहितनं न्यूयॉर्कमधील पिचवर नाराजी व्यक्त करत वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्यात चूक केल्याची एकप्रकारे कबुली दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला रोहित?

आयर्लंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला की, न्यूयॉर्कसारखंच पिच टी20 वर्ल्ड कपमधील आगामी सामन्यात असेल तर 15 जणांच्या टीममध्ये 4 स्पिनर्स असण्यात अर्थ नाही. या पिचवर आम्ही चार स्पिनर खेळवू असं वाटत नाही. आम्ही टीम निवडली त्यावेळी आम्हाला संतुलनाची आवश्यकता होती. आजच्या मॅचचं पिच हे चार फास्ट बॉलर्सना मदत करणारं होतं. त्यानंतरही आम्ही दोन ऑलराऊंडर्स स्पिनर्सला खेळवलं. 

टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय टीममध्ये रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या आग्रहावरुनच 15 जणांच्या टीममध्ये चार स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये भारतानं या चारपैकी जाडेजा आणि अक्षरला खेळवलं. न्यूयॉर्कमधील याच मैदानात भारताचा पाकिस्तानविरुद्ध रविवारी सामना होणार आहे.  

( नक्की वाचा : T20 WC 2024 : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाची बेस्ट 11 कोणती आणि का? )
 

रोहितनं दिलं दुखापतीवर अपडेट

रोहित शर्मानं आयर्लंडविरुद्ध 37 बॉलमध्ये 52 रन काढले. गुजरात टायटन्सचा फास्ट बॉलर जोश लिटिलच्या शॉर्टपिचवर बॉलवर पूल खेळण्याच्या प्रयत्नात तो जखमी झाला. त्याच्या उजव्या बाजूच्या वरच्या भागावर बॉल लागला. रोहितनं सामना संपल्यावर या दुखापतीबद्दलही अपडेट दिलं. 

Advertisement

होय, हात थोडा दुखत आहे, असं रोहितनं दुखापतीवर सांगितलं. या पिचबद्दल काय अपेक्षा करावी याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. पाच महिने जुन्या पिचवर (Rohit Sharma on New York Pitch)  खेळण्याची काय पद्धत आहे हे मला माहिती नाही. आम्ही दुसऱ्यांदा बॅटिंग केली त्यावेळी पिच स्थिर होतं, असं मला वाटत नाही. बॉलर्सकडं पुरेसा वेळ होता. त्यांना सातत्यानं एकाच लेन्थवर बॉलिंग करायची होती, असं रोहितनं सांगितलं.