T20 World Cup 2026 Points Table Update: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिजने जिम्बाब्वेवर 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील निकालामुळे अ गटातील (Group A)पाँइंटटेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
झिम्बाम्बेविरुद्धच्या विजयासह वेस्टइंडिजने 2 गुण आणि +5.350 च्या जबरदस्त नेट रन रेटसह (NRR) गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या अंतराने पराभूत झालेल्या भारताचा नेट रन रेट -3.800 असून टीम इंडिया आता तिसऱ्या स्थानी घसरली आहे.
वेस्ट इंडिजचे धडाकेबाज कामगिरी
शिमरोन हेटमायरने अवघ्या 34 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 85 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला कर्णधार रोवमन पॉवेलने (59) उत्तम साथ दिली. वेस्टइंडिजने 6 बाद 254 धावा केल्या, जो विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोअर ठरला. 255 धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना जिम्बाब्वेचा डाव 147 धावांत आटोपला. फिरकीपटू गुडाकेश याने 28 धावांत 4 विकेट घेत जिम्बाब्वेचे कंबरडे मोडले.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Semifinal Scenarios: टीम इंडिया सेमीफायनल गाठणार की नाही? ही आहेत 2 समीकरणे)
भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग आता कठीण?
वेस्टइंडिजच्या या मोठ्या विजयाचा थेट फटका भारताला बसला आहे. जर उपांत्य फेरीचा निर्णय नेट रन रेटवर आला, तर भारत पिछाडीवर पडू शकतो.
तीन संघांचे समान गुण : जर दक्षिण आफ्रिका विंडिजकडून हरली आणि त्यांनी जिम्बाब्वेला हरवले, तर त्यांचे 4 गुण होतील. त्याच वेळी भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर भारत, आफ्रिका आणि विंडिज या तिन्ही संघांचे 4-4 गुण होतील.
विजय अनिवार्य : अशा स्थितीत केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर भारताला जिम्बाब्वे (26 फेब्रुवारी) आणि वेस्टइंडिज (1 मार्च) या दोन्ही संघांना खूप मोठ्या फरकाने हरवावे लागेल, जेणेकरून रन रेटमध्ये सुधारणा होईल.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026: सगळीकडे फक्त NRR ची चर्चा, भारत सेमी फायनल गाठणार का? काय आहे नेट रन-रेटचा फॉर्म्युला?)
सुपर-8 : अ गटाची सद्यस्थिती
- वेस्टइंडिज - 2 (+5.350)
- दक्षिण आफ्रिका - 2 (+3.800)
- भारत - 0 (-3.800)
- जिम्बाब्वे - 0 (-5.350)