T20 WC 2026: BCCI चा खजिना उघडला! 131 कोटींच्या बक्षीसाची अशी होणार विभागणी; कुणाला किती मिळणार? वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 Prize Money: 2024 मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा 125 कोटी रुपये देण्यात आले होते, मात्र यावेळी ही रक्कम वाढवून 131 कोटी रुपये करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India : BCCI ने जाहीर केलेल्या 131 कोटी रुपयांपैकी मोठा वाटा खेळाडूंना मिळणार आहे.
मुंबई:

BCCI Announces ₹131 Crore Reward for Team India: भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या दिमाखदार विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम इंडियावर पैशांचा पाऊस पाडला आहे. चॅम्पियन ठरलेल्या भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी तब्बल 131 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे BCCI ने स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. 2024 मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा 125 कोटी रुपये देण्यात आले होते, मात्र यावेळी ही रक्कम वाढवून 131 कोटी रुपये करण्यात आली आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच सामना गमावला. फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 रनने पराभव करत तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर ताबा मिळवला. या विजयामुळे भारत T20 वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा जिंकणारा  जगातील पहिला संघ ठरला आहे, तसेच यजमान म्हणून वर्ल्ड कप जिंकण्याचा मानही पहिल्यांदाच भारताला मिळाला आहे.

( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )

कोणाला किती रक्कम मिळणार?

BCCI ने जाहीर केलेल्या 131 कोटी रुपयांपैकी मोठा वाटा खेळाडूंना मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या 15 खेळाडूंना प्रत्येकी 6 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उरलेली 41 कोटी रुपयांची रक्कम सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग स्टाफमध्ये त्यांच्या अनुभवानुसार आणि पदानुसार विभागली जाईल. याबाबत अधिकृत आकडेवारी लवकरच स्पष्ट होईल, मात्र खेळाडूंना मिळणारी ही रक्कम त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

BCCI आणि ICC कडून बक्षीसांची लयलूट

या ऐतिहासिक विजयानंतर केवळ BCCI च नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने देखील टीम इंडियाला मालामाल केले आहे. फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर भारताला ICC कडून 2.34 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 21.5 कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला 1.17 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10.75 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले आहे.

( नक्की वाचा : T20 वर्ल्ड कप जिंकला तरी Gautam Gambhir संतापलेलाच? म्हणाला, 'त्या' 30 लोकांशिवाय मला कोणाचं देणंघेणं नाही! )

BCCI सचिव देवजित सैकिया यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, भारतीय संघाने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सिलेक्टर्स यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज आपण हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकलो आहोत. भविष्यातही टीम इंडिया अशीच चमकदार कामगिरी करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article